Homeटेक्नॉलॉजीमेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत!

अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर त्यासाठी माणसाच्या विचारसरणीत मूलभूत बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी केले.

ते म्हणाले की, समाजातील अनेक समस्या या “अजनुकीय माहिती” (NGI) म्हणजेच व्यक्तीच्या मेंदूत साठलेल्या संस्कार, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक पॅटर्नमुळे निर्माण होतात. “कायदे बाहेरून बदलतात, पण वर्तन आतून नियंत्रित होते. त्यामुळे NGI मध्ये बदल न झाल्यास समाजात खरा बदल घडत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अॅड. गवळी यांनी सांगितले की, जातव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य आणि मतदारदास्य या समस्या पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहण्यामागे चुकीची NGI कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी “RECONSCIO गव्हर्नन्स” या संकल्पनेवर भर दिला. जागरूकता, आत्मनियंत्रण आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांच्या आधारे व्यक्तीने निर्णय घेतल्यास समाजात संतुलन साधता येईल, असे ते म्हणाले.

मानवी भावनांमध्ये ‘Centripetal’ (स्वकेंद्रित) आणि ‘Centrifugal’ (समाजकेंद्रित) या दोन प्रकारांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “स्वार्थ आणि समाजहित यामधील संतुलन बिघडल्यामुळेच अनेक सामाजिक ताण निर्माण होतात,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या समस्यांवर दीर्घकालीन उपाय म्हणून शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः इयत्ता ४ ते १२ या वयोगटात वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, विवेक आणि सामाजिक जबाबदारी यांचे शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते प्रयत्नशील असून या संकल्पनांच्या प्रसारासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते राज्यभर जनजागृती करत असून, शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि कायदेशीर मार्गदर्शनाद्वारे NGI मध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या उपक्रमात अॅड. अमित थोरात, अॅड. लक्ष्मण पोकळे, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, प्रकाश गोसावी, प्रतीक म्हस्के, वीर बहादुर प्रजापती, पोपट भोसले, यमनाजी म्हस्के, संजय देवढे, अनिल घाटविसावे, अशोक भोसले, रमा आढाव, आनंदा आढाव, संजय शेकडे, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, बाजीराव गव्हाणे, लखन साळवे आदी कार्यकर्ते सक्रियपणे योगदान देत आहेत.

“स्वातंत्र्याने कायदे बदलले… आता मेंदू बदलण्याची वेळ आली आहे,” असा संदेश देत अॅड. गवळी यांनी समाजपरिवर्तनासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

नागपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

नागपूर (प्रतिनिधी) — भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

error: Content is protected !!