Homeक्राईमसमाजातील खोट्या ‘कॅप्टन’विरोधात जनलोक अदालत रणांगणात!

समाजातील खोट्या ‘कॅप्टन’विरोधात जनलोक अदालत रणांगणात!

पीपल्स हेल्पलाईनची “डिच्चू फत्ते कॅप्चर!” मोहीम

अहिल्यानगर/(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य समाचार देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांच्या सन्मानाचे प्रतीक असलेली पदे काही व्यक्तींकडून केवळ नावापुरती वापरली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. “कॅप्टन” सारख्या संरक्षण दलातील पदांचा अनधिकृत वापर करून समाजात खोटी प्रतिष्ठा निर्माण केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईन तर्फे शहरातील हुतात्मा स्मारक येथे 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी १० वाजता आयोजित जनलोक अदालतमध्ये “डिच्चू फत्ते कॅप्चर!” मोहिमेच्या माध्यमातून अशा खोट्या पदांचा पर्दाफाश केला जाणार असल्याची माहिती जेष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
“कॅप्टन” हे केवळ एक संबोधन नसून ते शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचे जिवंत प्रतीक आहे. अशा पदांचा गैरवापर करणे म्हणजे थेट भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानाला धक्का देणे होय, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. जनलोक अदालतने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, “खोट्या प्रतिष्ठेच्या आड लपलेले चेहरे आता कायद्याच्या चौकटीत उघड केले जातील.”
जनलोक अदालततर्फे कायदेशीर व नैतिक चौकटीत कठोर ठराव मांडून महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत. संरक्षण दलांच्या पदांचा गैरवापर करणाऱ्यांनी तात्काळ तो थांबवावा, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. “पदाचा सन्मान — राष्ट्राचा अभिमान” या विषयावर व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम कोणालाही बदनाम करण्यासाठी नसून सत्य समोर आणण्यासाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. “ही अदालत कोणालाही बदनाम करण्यासाठी नाही, पण सत्य दडपण्यासाठीही नाही,” असे त्यांनी नमूद केले. नैतिकता आणि कायदेशीरतेचा समन्वय साधत न्याय मिळवण्यावर भर दिला जाणार आहे.
समाजात पसरलेल्या चुकीच्या नॉन-जिनेटिक इन्फॉर्मेशन (NGI) विरुद्ध निर्णायक लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. “डिच्चू फत्ते कॅप्चर” ही केवळ घोषणा नसून खोटेपणाविरुद्धचा ठोस प्रहार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जनलोक अदालतच्या माध्यमातून नागरिकांना थेट सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणत्याही व्यक्तीकडून संरक्षण दलांच्या पदांचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित पुरावे व माहिती सादर करून तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

हा लढा व्यक्तीविरुद्ध नसून समाजातील खोट्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेविरुद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेत अशोक सब्बन, प्रकाश थोरात,ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते सक्रिय आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!