“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला!

५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!
.प्रतिनिधी : प्रकाश थोरात | महाराष्ट्र राज्य समाचार/भारतीय संसदीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरू शकणारे Constitution (131st Amendment) Bill, 2026 संसदेत फेटाळण्यात आले असून, लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. या निर्णयाकडे केवळ एका विधेयकाच्या पराभवाच्या दृष्टीने न पाहता, “संख्येपेक्षा समज महत्त्वाची” या मूल्याचा स्वीकार म्हणून पाहिले जात आहे.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही संख्या वाढ नव्हती — हा शासनातील असमतोल (Entropy) वाढवण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मते, खासदारांची संख्या वाढवली असती तर समस्यांची संख्या वाढली असती, स्वार्थकेंद्रित (Centripetal) प्रतिनिधित्व बळकट झाले असते, आणि लोकशाहीचे ‘Subconscio Zundshahi’ मध्ये रूपांतर झाले असते. ते म्हणतात संख्या वाढवणे म्हणजे लोकशाही बळकट करणे नव्हे, तर अनियंत्रित विस्तार करणे आहे,असा इशाराही त्यांनी दिला.
संसदेत ‘RECONSCIO क्षण आला आणि या निर्णयात एक वेगळेपण दिसून आले. खासदारांनी राजकीय समीकरणांपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. “जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला. या प्रक्रियेत RECONSCIO Governance ची झलक दिसून आली, जिथे निर्णय केवळ संख्येवर नव्हे तर गुणवत्ता, संतुलन आणि दूरदृष्टीवर आधारित होता. IKT विश्लेषण : Governance विरुद्ध ExecutionE xecution (भौतिक विस्तार) → ५४३ → ८५० Governance (गुणवत्ता) → निर्णयक्षमतेची उंची, संतुलन, परिणामकारकता दिसून आली.
ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले की, Execution वाढवून Governance सुधारत नाही; उलट चुकीच्या NGI मुळे शासनातील गोंधळ वाढतो. भविष्यासाठी इशारा जर भारताने केवळ संख्या वाढवण्याचा मार्ग स्वीकारला तर —संसद ‘झुंडशाही ’ मध्ये परिवर्तित होण्याचा धोका आहे. निर्णय प्रक्रियेत स्वार्थाचे वर्चस्व, आणि लोकशाही केवळ नावापुरती उरण्याची शक्यता निर्माण होईल.
या वर उपाय : RECONSCIO रेवोलुशन पीपल्स हेल्पलाईनने पुढील दिशा सुचवली आहे. शिक्षणाद्वारे NGI (अजनुकीय माहिती) सुधारणा स्वार्थकेंद्रिततेतून (Centripetal) समाजकेंद्रिततेकडे (Centrifugal) परिवर्तन,लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांचा समन्वय,“Governance of the RECONSCIO, by the RECONSCIO, for the RECONSCIO” हीच भविष्यातील लोकशाहीची दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड. गवळी सुचवतात,संख्या वाढवून संसद सुधरत नाही —मन बदलल्याशिवाय शासन बदलत नाही! भारताला ८५० खासदारांची गरज नाही तर ८५० जागरूक, सुजाण आणि उत्तरदायी RECONSCIO मेंदूंची गरज आहे!








