प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का? -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण

महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय समीकरणे, अंधश्रद्धा, भावनिक प्रभाव आणि मतांची खरेदी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून येत असताना, अशा सर्व घटकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेला कॅप्चर अशोक खरात मात्र राजकारणात प्रवेश टाळतो—हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी या संदर्भात भाष्य करताना सांगितले की,“एखाद्या व्यक्तीकडे जातीय समीकरणे नियंत्रित करण्याची क्षमता, देवदर्शनाद्वारे भावनिक प्रभाव निर्माण करण्याची ताकद, मतांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची व्यवस्था आणि विशेषतः महिला मतदारांवर मानसिक प्रभाव टाकण्याची क्षमता असेल, तर त्याला केंद्र सरकारपर्यंत पोहोचणे कठीण नसते.
”राजकारणाची खरी समीकरणे — मूल्यांपेक्षा प्रभावाला प्राधान्य आहे. अॅड. गवळी यांच्या मते, सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांसारख्या मूल्यांना दुय्यम स्थान मिळत असून, त्याऐवजी खालील घटक निर्णायक ठरत आहेत—
जातीय ध्रुवीकरण, आणि अंधश्रद्धेचा वापर होतो व मतदारांवर भावनिक व आर्थिक प्रभाव पडत असतो “अशा परिस्थितीत या सर्व घटकांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाकडून सहजपणे तिकीट मिळवू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात प्रवेश का टाळतो? — NGI व RECONSCIO दृष्टिकोन, या प्रश्नाचे उत्तर देताना अॅड. गवळी यांनी ‘अजनुकीय माहिती’ (NGI) आणि ‘RECONSCIO गव्हर्नन्स’ या संकल्पनांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मते, “आजचे बहुतांश राजकारण Subconscio गव्हर्नन्सवर चालते—जिथे मतदारांचे निर्णय त्यांच्या मेंदूत साठलेल्या जुन्या NGI (संस्कार, जात, अंधश्रद्धा) यावर आधारित असतात.” अशा व्यवस्थेत प्रवेश करणे म्हणजे—तडजोडी स्वीकारणे हे मूल्यांपेक्षा समीकरणांना प्राधान्य देणे,सार्वजनिक टीका व जबाबदारीचा सामना करणे “प्रत्येक प्रभावशाली व्यक्ती यासाठी तयार असेलच असे नाही,” असे त्यांनी नमूद केले.
अॅड. गवळी यांनी पुढे सांगितले की, काही व्यक्ती राजकारणात न जाता बाहेरूनच प्रभाव टाकणे पसंत करतात. कारण सत्ता मिळाली तर जबाबदारी येते,पण सत्तेबाहेर राहून प्रभाव टिकवता येतो “मतं वळवणं सोपं आहे… पण मन बदलणं कठीण आहे!”
कॅप्चर अशोक खरात याच्याकडे मतांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असली, तरी राजकारणात प्रवेश टाळणे—हे केवळ वैयक्तिक निर्णय नसून सध्याच्या राजकीय व्यवस्थेचे वास्तव दर्शवणारा आरसा असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले.








