
नवी दिल्ली-२२ जुलै २०२५ देशाची राजधानी मुगल अत्याचाराचे वैभव शारदा सेवकांनी सलग तीन दिवस डोळे भरुन पाहिली. मराठ्यांचा वैभवशाली पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या राजधानी दिल्लीला आज खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने शिक्षकांना डोळे भरून जवळून पाहता आले. लाख दिड लाखाचा पगार ओलांडलेल्या सौदर्यपूजक शिक्षकांना गौरवी पराक्रमाच्या प्रेरणास्थानांचे दर्शन घेण्यास सवडच झाली नव्हती. मास्तर कादंबरीचे लेखक: वि स खांडेकर यांना देखील सौंदर्य ग्रंथाचा संकल्प पूर्ण झाल्याचे आज समाधान लाभले असेल.
जवळपास दहाव्या शतकापासून भारतात यावनी अत्याचाराची खुणगाठ असलेली राजधानी दिल्ली आज अ नगरकर शिक्षकांना जवळून पाहता आली व समजून घेता आली.
शिक्षकांच्या चेह-यावरील आजची प्रतिक्रिया ही खरोखरच अनोखी होती. विद्यादानाच्या सेवेत असतानां चाळीस पंचेचाळीस वर्ष अनेक तरुण पिढ्यांना शिकवत शिकवत सेवानिवृत्त झालेल्या गुरुजनाना आज खासदार निलेश लंके यांनी एक आगळा वेगळा अभ्यासदौ-याची भेट दिली, शारदेच्या दरबारातील शिक्षक वर्गाला वर्गात गेल्यानंतर जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांच्या समोर दिल्लीच्या इतिहासाची ताजी हिरवी पाने टवटवीत करुन उकलताना
विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना सोपे जाईल. आजच्या अनुभूतितून, लाख गेले तरी लक्षावधी मिळतील.लाखांचा इतिहास निर्माण करणारा पोशिंदा पुन्हा एकदा पुनर्जिवीत होणार आहे. महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात, चंद्रभागेच्या वाळवंटात अवघा वारकरी अवघा विठ्ठल ऐकविता यावा असे राकृष्ण हरीच्या गजरात दिल्ली दरबारी श्रध्देचा रसिक वारकरी प्रशस्त महाराष्ट्र सदनात जमा झाला. आणि विठ्ठल भक्तांसाठी जमा झालेल्या अवघा इतिहास श्रध्देचा वारकरी नगर जिल्ह्याच्या कानाकोपरातून दिल्ली इतिहासाच्या साक्षीने कृष्णभक्तीच्या आतुरतेने विठ्ठलाच्या इतिहासाला भेटून धन्य झाला.










