Homeताज्या बातम्यासा. बां.विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुंडलिक शेळके यांचा निवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

सा. बां.विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुंडलिक शेळके यांचा निवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर (प्रकाश थोरात):- सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर येथे उपकार्यकारी अभियंता श्री. कुंडलिक शेळके यांचा निवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात व स्नेहभावाने पार पडला. या वेळी त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय सेवेला सन्मान देण्यात आला.

समारंभ प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. उत्तम बोरुडे आणि उपविभागाचे उपअभियंता श्री. शशी सुतार यांनी श्री. शेळके दांपत्याचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी बोलताना श्री बोरुडे यांनी शेळके यांचे प्रशासकीय कार्य, बांधकामातील काटेकोर अंमलबजावणी व सहकाऱ्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध याचे विशेष कौतुक केले.

या समारंभास सेवानिवृत्त उपअभियंता श्री. प्रकाश तीपुळे, शाखा अभियंता श्री. सतीश शिंदे तसेच विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी श्री. शेळके यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.शेवटी श्री. शेळके यांनी आपल्या निवृत्तीच्या प्रसंगी सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे आभार मानून, विभागातील सहकार्य व सहवासाचे स्मरण करत भावनिक भाषण केले. समारंभात बोलताना श्री. शेळके भावुक होत म्हणाले, “या विभागात माझ्या सेवेचा प्रवास अत्यंत संस्मरणीय ठरला. इथले अधिकारी, कर्मचारी हे माझं दुसरं कुटुंबच झाले होते. अनेक चढ-उतार, ताणतणाव यांना सामोरे जात आम्ही काम केलं. पण जेव्हा सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो, तेव्हा कोणतीही जबाबदारी पार पाडणं सहज शक्य होतं. या प्रवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आता जेव्हा विभागातून बाहेर पडतोय, तेव्हा मनात समाधान आहे की मी काम करत असताना सर्वांना बरोबर घेतले प्रामाणिकपणे शासनाची सेवा केली. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचा कंठ दाटून आला. शेवटी त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!