अहिल्यानगरच्या कार्यक्षम कर्मचाऱ्याचा उल्लेखनीय प्रवास !
अहिल्यानगर (प्रतिनिधीअनिल घाटविसावे) – प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा, निष्ठावान सेवा आणि उत्कृष्ट कार्यक्षमता याच्या जोरावर बाळासाहेब कनगरे यांची पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) पदावर बढती झाली असून, ही बातमी अहिल्यानगर शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.बाळासाहेब कनगर यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना जनतेच्या हितासाठी कार्य केले असून, त्यांच्या कठोर मेहनतीची आणि कार्यतत्परतेची ही पोलीस विभागाने दखल घेतली. त्यांना पोलीस हवालदार पदापासून सुरू झालेल्या प्रवासात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात जनतेत विश्वास निर्माण केला.त्यांच्या बढतीबद्दल पोलीस दलातील अधिकारी, सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात ते अधिक जबाबदारीने आणि निष्ठेने सेवा करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बढतीनंतर बाळासाहेब कनगर यांनी सांगितले की, “ही संधी म्हणजे माझ्या कर्तव्यनिष्ठेचा सन्मान आहे. माझे हे यश माझ्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले.”अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.










