Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा आसूड सत्याग्रह जारी करण्यात येणार-ॲड. कारभारी गवळी

महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा आसूड सत्याग्रह जारी करण्यात येणार-ॲड. कारभारी गवळी

 काळी आई मुक्तीसंग्राम अन्यायाविरुद्ध आता थेट अंमलबजावणी!

एप्रिल 12 सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक येथे करणार

अहिल्यानगर / पुणे — महाराष्ट्रातील विविध भागांत शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक व दबावाखाली हस्तांतरित झाल्याच्या तक्रारींनी गंभीर वळण घेतले आहे. “आमची जमीन आम्ही विकली नाही, ती लुटली गेली,” असा आक्रोश अनेक पीडित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. “तृप्तबाला” आणि “ओश्नो जल” यांसारख्या योजनांच्या नावाखाली कर्जबाजारी शेतकऱ्यांना लक्ष्य करून अत्यल्प किमतीत जमीन हस्तगत केल्याचे आरोप समोर आले आहेत.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांनी या प्रकाराला “काळी आईवरचा अन्याय” असे संबोधत थेट कृतीची घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कांवर आघात आहे. भारतीय संविधानातील Article 21 (जगण्याचा अधिकार) आणि Article 300A (मालमत्तेचा अधिकार) अंतर्गत फसवणुकीने घेतलेली जमीन परत मिळवता येऊ शकते, असा दावा त्यांनी केला असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या जमीन फसवणूक, बेकायदेशीर हस्तांतरण आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात “आसूड सत्याग्रह” सुरू करण्याची घोषणा पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनतर्फे Mediation Act 2023 अंतर्गत “जनलोक अदालत” आयोजित करण्यात येत आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारक येथे होणाऱ्या या बैठकीत आंदोलनात तक्रार नोंदणी, कागदपत्र तपासणी, तसेच फौजदारी कारवाईसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी 7/12 उतारे, करारपत्रे आणि संबंधित पुरावे सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकाश थोरात त्यांनी राज्यभरातील पीडित शेतकऱ्यांना एकत्र आणून हा आंदोलनात्मक लढा उभारला जाणार असून, अन्यायाविरुद्ध थेट कायदेशीर व लोकआंदोलनाच्या माध्यमातून “ॲक्शन 500” लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“डिच्चू फत्ते!” या घोषणेसह “काळी आई मुक्ती संग्राम” सुरू झाल्याचा दावा करत ही चळवळ राज्यभर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. “ही फक्त बातमी नाही, ही चळवळ आहे,” असे सांगत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हा लढा व्यक्तीविरुद्ध नसून समाजातील खोट्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेविरुद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेत अशोक सब्बन, प्रकाश थोरात,ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते सक्रिय आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!