Homeताज्या बातम्याशबरीची करुणा व भक्ती म्हणजे अहिंसा, समर्पणाची महान परंपरा -प्रबोधनकार ह.भ.प.अभिमन्यू गिरी

शबरीची करुणा व भक्ती म्हणजे अहिंसा, समर्पणाची महान परंपरा -प्रबोधनकार ह.भ.प.अभिमन्यू गिरी

हरिनाम सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
अहिल्या नगर (तपोवन परिसर) | प्रतिनिधी – तपोवन परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान ह.भ.प. अभिमन्यू गिरी महाराज यांनी शबरी हिच्या जीवनातील करुणा आणि भक्ती यांचा अत्यंत हृदयस्पर्शी उहापोह केला.
तपोवन परिसर, अहिल्या नगर येथे ह.भ.प. अभिमन्यू गिरी महाराज यांच्या अमृतवाणीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून, परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 2022 साली केवळ चार भाविकांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा सप्ताह आज हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य स्वरूपात पार पडत आहे.
कीर्तन व प्रवचनादरम्यान अभिमन्यू गिरी महाराजांनी शबरी आणि मातंग ऋषी यांच्या आश्रमातील प्रसंग अत्यंत प्रभावी शैलीत मांडला. त्यांनी सांगितले की, शबरी ही करुणामयी व दयाळू स्वभावाची होती. लग्नाच्या वेळी प्राण्यांची हत्या होणार असल्याचे पाहून तिने त्या हिंसेला विरोध केला आणि घर सोडून मातंग ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला.
महाराजांनी सांगितले की, शबरी ही लहानपणापासूनच दयाळू आणि करुणामयी स्वभावाची होती. तिच्या लग्नावेळी प्राण्यांची हत्या होणार असल्याचे पाहून तिने त्या हिंसेचा तीव्र विरोध केला आणि त्या प्रसंगातून पलायन केले. तिच्या या कृतीतून “अहिंसा हाच खरा धर्ममार्ग” आहे. हा संदेश मानव जातीला मिळतो.
प्रबोधनकार अभिमन्यू गिरी म्हणाले, शबरीने मातंग ऋषी यांच्या आश्रमात आश्रय घेतला आणि पूर्ण समर्पणाने गुरुसेवा केली. आश्रमातील प्रत्येक कार्य ती निष्ठेने पार पाडत असे. विशेष म्हणजे, आपल्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून तिने आयुष्यभर भगवान रामाच्या आगमनाची प्रतीक्षा केली.
शबरी रोज जंगलातील वाटा स्वच्छ करत असे, कारण तिला खात्री होती की एक दिवस राम त्या मार्गाने येतील. तिच्या या निखळ भक्तीमुळेच रामांनी तिच्या हातचे फळ प्रेमाने स्वीकारले, हा प्रसंग भक्तीचे सर्वोच्च उदाहरण मानला जातो.
महाराजांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले की, शबरीची कथा आपल्याला करुणा, श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती यांचे महत्त्व शिकवते. जात, प्रतिष्ठा यापेक्षा अंतःकरणातील शुद्धता आणि प्रेम यालाच खरे स्थान आहे, हा संदेश त्यांनी भाविकांना दिला.

या प्रवचनामुळे उपस्थित भाविक भारावून गेले असून, सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!