Homeताज्या बातम्यामहात्मा फुले चित्रपट टॅक्स फ्री करून देशातील महिलांना मोफत दाखवावा - पीपल्स...

महात्मा फुले चित्रपट टॅक्स फ्री करून देशातील महिलांना मोफत दाखवावा – पीपल्स हेल्पलाइन चे प्रकाश थोरात

महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट महिलांना देणार प्रेरणा – पीपल्स हेल्पलाइनचे प्रकाश थोरात

नगर (प्रतिनिधी)- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा व देशभरातील महिलांना,लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी केली आहे.
प्रकाश थोरात म्हणाले की, जगातील दुःख स्त्री-पुरुष विषमतेतून निर्माण झाले आहे. ही विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी स्त्री व दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा पाया घातला.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि वाचनालयांचे जाळे उभारले. 1854 मध्ये त्यांनी देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात केली. विधवांच्या संगोपनासाठी 1863 मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना करून हुंड्याशिवाय विवाहाची प्रथा रूढ केली. अस्पृश्‍यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून जातिभेदाच्या विरोधात पहिले पाऊल उचलले. त्यांनी बालविवाह विरोधात आवाज उठवला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रतिष्ठा दिली. स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह घडवून आणत जाती निर्मूलनाच्या चळवळीला स्वतःच्या घरातून सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्याची गाथा फुले या चित्रपटात मांडली असून, तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रकाश थोरात यांनी सांगितले. या चित्रपटातून आजच्या महिलांना प्रेरणा व आत्मविश्‍वास वाढवणारी दिशा मिळेल आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला नवे बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!