Homeक्राईमपत्रकारावरील हल्ल्यातील आरोपीच्या मुसक्या आवळणार : पोलीस अधीक्षक घार्गे

पत्रकारावरील हल्ल्यातील आरोपीच्या मुसक्या आवळणार : पोलीस अधीक्षक घार्गे

राज्य पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन

अहिल्यानगर प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची मिळालेली धमकी तसेच न्युज 18 लोकमतचे जुन्नर प्रतिनिधी सचिन तोडकर यांचेवर वृत्तांकन करताना झालेल्या हल्याच्या निषेधार्ह तसेच आरोपींवर कारवाई होणे बाबत अहिल्यानगर चे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव अरोटे यांनी निवेदन दिले. आहे. यावेळी अहिल्यानगर डिजीटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड आणि राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे हे उपस्थित होते.

सिद्धार्थ भोकरे यांनी आपल्या दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उपडपणे भारत प्रेम का दाखवत नाही? आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं…. असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे.या धमकीचा राज्य पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिद्धार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देऊन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच सचिन तोडकर यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगांव याठिकाणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी विशेष बातमी न्यूज 18 लोकमत वर दाखवली होती. या बातमीत खाजगी एजंटांकडून कामगारांची आर्थिक लूट, मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी पैसे वसूल करणे आणि शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार उघड झाले होते. या बातमीनंतर प्रतिनिधीच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनाच्या काचा फोडल्या असून असून, ही घटना पत्रकारांवरील हल्ल्याचा गंभीर प्रकार आहे.या दोन्ही घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संबंधित हल्लेखोर आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!