Homeताज्या बातम्यागुणवंतांचा गौरव व करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सोहळा अंबाजोगाईत संपन्न

गुणवंतांचा गौरव व करिअर मार्गदर्शनाचा प्रेरणादायी सोहळा अंबाजोगाईत संपन्न

✍️ प्रतिनिधी | अंबाजोगाई’ :- प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रतिभा असते; ती ओळखून, योग्य मार्गदर्शनाच्या आधारे विकसित केल्यास तीच व्यक्ती विक्रमांचे शिखर गाठू शकते,’ असा प्रभावी संदेश सुप्रसिद्ध विधिज्ञ व अभ्यासू वक्ते ऍड. राहुल बनसोडे (नाशिक) यांनी दिला. अंबाजोगाई येथे आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते.हा प्रेरणादायी सोहळा नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. ऍड. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून स्पष्ट केले की, “स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ गुणांकन पुरेसे नसते; तर आत्मविश्वास, ध्येयाशी बांधिलकी, सातत्य, आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. आपल्या जीवनाची चमक इतरांवर न ठेवता, स्वतःच ती निर्माण केली पाहिजे.”त्यांनी विधी क्षेत्रातील विविध करिअर संधींचे – न्यायसंस्था, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय कायदे, सल्लागार सेवा, प्रशासन, संशोधन इत्यादींचे विस्तृत विवेचन करत विद्यार्थ्यांना या क्षेत्रांकडे वळण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमात ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये विक्रम नोंदविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऍड. बनसोडे म्हणाले, “या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना योग्य संधी व मार्गदर्शनाच्या मदतीने विकसित करून कीर्तिमान प्रस्थापित केले आहेत. हेच दाखवते की प्रत्येक माणूस काहीतरी विलक्षण करू शकतो.”

कार्यक्रमात ‘आई सेंटर प्रो – दु डायनॅमिक कम्यूनिकेटर’ आणि ‘आई सेंटर प्रो – चॅम्पियन’ या उपक्रमांतर्गत केवळ ३१ दिवसांत इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, ग्रंथ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेषतः इंग्रजीच्या शिक्षणामागे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सर नागेश जोंधळे यांचा सखोल प्रभाव जाणवला.सर नागेश जोंधळे यांचा परिचय “विश्वविक्रमवीर व ऍमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक” असा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली “आई सेंटर प्रो” ही संस्था शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे, अशी गौरवोद्गार ऍड. बनसोडे यांनी काढले.या भव्य कार्यक्रमात प्रा. प्रदीप रोडे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. राम गायकवाड, राजेंद्र घोडके, जगन सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किर्तीराज लोणारे यांनी केले. या प्रेरणादायी उपक्रमासाठी नालंदा फाऊंडेशन आणि आई फाऊंडेशनने संयुक्त पुढाकार घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!