Homeताज्या बातम्या"देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी मध्ये ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीणे चुरस!...

“देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी मध्ये ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीणे चुरस! “!

वंचित बहुजन आघाडी कडून नगराध्यक्ष पदासाठी नामांकित विधिज्ञ अ‍ॅड. प्रसाद सांगळे यांची उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर ( देवळाली प्रवरा )नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या उमेदवारीला देवळाली करांचा दणदणीत प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारी मुळे राजकारणातील समीकरण बदलले आहे.

देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले उमेदवार ॲडव्होकेट प्रसाद सांगळे हे केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नसून, समाजाच्या न्यायासाठी लढणारे संवेदनशील, अभ्यासू आणि नितीमूल्य जपणारे प्रतिष्ठित विधिज्ञ म्हणून परिचित आहेत.

कायद्याचे सखोल ज्ञान, तडफदार युक्तिवाद, आणि न्यायासाठीची अबाधित निष्ठा यामुळे सांगळे यांनी अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवून दिले आहेत. दुर्बल, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी न्याय मिळवून देताना त्यांनी स्वतःचे आर्थिक व व्यक्तिगत हित कधीच पुढे ठेवले नाही. निस्वार्थी सेवा, प्रामाणिक वकिली आणि मानवतावादी दृष्टिकोन ही त्यांची खरी ओळख आहे.

सांगळे हे देवळाली प्रवराचे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र, कायदेतज्ज्ञ आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्य नागरिकांत त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असून, सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थी काम यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य समाचार शी बोलतांना ॲडव्होकेट प्रसाद सांगळेम्हणाले कि, देवळाली प्रवरा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास हा आपले प्रथम ध्येय आहे, असे सांगळे यांनी उमेदवारीनंतर व्यक्त केले. शैक्षणिक, कायदेशीर आणि प्रशासनिक ज्ञानाच्या जोरावर “देवळाली प्रवरा बदलून दाखवू” असा त्यांचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक कार्यातही सांगळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, युवकांमध्ये शिक्षणाची जाणीव, नागरिकांमध्ये कायदेशीर साक्षरता व हक्कांसाठीची जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेतील अनेक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मते देऊन विकासाचा योग्य मार्ग दाखवला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी अशी स्वच्छ प्रतिमा असलेला, कायदेशीर जाण असलेला आणि लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणारा उमेदवार मिळणे ही देवळाली प्रवरासाठी मोठी जमेची बाजू ठरत आहे.

स्थानिकांमध्ये सांगळे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “विकास, पारदर्शकता आणि न्याय” या ध्येयांसह ते शहराला नवी उभारी देण्यास सक्षम नेतृत्व आहेत, अशी लोकांमध्ये अशा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!