सर्व समाजाला घेऊन जाणार व्यक्तिमत्व अण्णासाहेब गायकवाड
अहमदनगर (दि. ८ सप्टेंबर) – डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समिती (नोंदणीकृत), राष्ट्रीय दलित महापंचायत, नवी दिल्ली यांच्या वतीने अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे व पुणे जिल्हाध्यक्ष संविधान अभ्यासक पत्रकार सुदाम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोषणा करण्यात आली. समाजकारणात अण्णासाहेब गायकवाड यांनी दाखविलेली निष्ठा, समाजजागृतीचे कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती असलेला आदर याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समाजासाठी दिलेल्या पदाचा योग्य वापर करून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्य करावे, कुठल्याही वादविवाद व राजकारणात न अडकता समितीच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल जिल्ह्यात सर्वत्र अण्णासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन होत असून सामाजिक चळवळीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. या वेळी अनिल घाटविसावे, प्रकाश थोरात, मिलिंद आंग्रे, सलीम शेख, दीपक गायकवाड, आदींनी अभिनंदन केले आहे.










