शेगाव-पैठण, गेवराई-पाथर्डी व नेवासा-अहिल्यानगर मार्गांवर वनराई निर्माण होणार:- प्रल्हाद पाठक
अहिल्यानगर प्रतिनिधी –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शेवगाव–पैठण, गेवराई–पाथर्डी व नेवासा–अहिल्यानगर या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वनराई निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या धोरणानुसार या रस्त्यांच्या कडेला २०,५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या कामासाठी ठेकेदारांकडून लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे रस्त्यांवर हिरवाई वाढून पर्यावरण संवर्धनाबरोबरच प्रदूषण नियंत्रण, सावलीची सोय व पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून पुढील काळात या वृक्षलागवडीमुळे “ग्रीन कॉरिडॉर” तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










