
भारतीय बौध्द महासभा व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मा. मंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांचा अण्णासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सत्कार
अहिल्या नगर : भारतीय बौध्द महासभा व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नगर येथील हॉटेल परेडाईज येथे माजी समाजकल्याण मंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांचा अण्णासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार भाऊसाहेब कांबळे, राज्य मंत्री ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश अध्यक्ष शांताराम कारंडे, उपाध्यक्ष सुदाम कांबळे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब केदारी, माधवराव गायकवाड, संतोष कांबळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिशे यांसह मान्यवर उपस्थित होते.










