भिंगार शहरामध्ये प्रथमच भव्य सुसज्ज SG’S सलून चे उदघाटन !
[उद्घाटन करताना मातोश्री,बौद्धाचार्य अण्णासाहेब गायकवाड,दशरथ घाटविसावे,प्रकाश थोरात सुयोग घाट विसावे.]
अहिल्यानगर | सोमवार, 14 जुलै 2025 – बेलेश्वर पार्क, महेश नगर, नगर-पाथर्डी रोड येथे SG’S SALOON या नूतन सलूनचे भव्य उद्घाटन त्यांच्या मातोश्री यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, कुटुंबीय व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स एप सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पीपल्स हेपलाईनचे आर्किटेक्ट प्रकाश थोरात, भारतीय बौद्ध महासभा, केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य अण्णासाहेब गायकवाड, समाजसेवक संजय देवडे, अनिल घाटविसावे,भाऊसाहेब गायकवाड,बौद्धाचार्य दीपक गायकवाड, सिद्धू कांबळे, गौरव घाटविसावे,अविनाश गायकवाड, पप्पू कांबळे,बाळासाहेब घाटविसावे, तसेच इतर प्रतिष्ठीत मान्यवरांनी हजेरी लावून नव्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

या वेळी फर्म चे चालक सुयोग घाटविसावे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व समारंभाच्या शेवटी श्री. दशरथ घाटविसावे यांनी सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. घाटविसावे परिवाराने आयोजित केलेला हा समारंभ उत्साही वातावरणात, मंगलमय आणि प्रेरणादायी ठरला.
