महिलांनी सांस्कृतिक वारसा हवा जपावा
-: मानसी देठे
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सावेडीतील मानसी डान्स स्टुडिओच्या वतीने पारंपरिक सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंगलागौर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २७ जुलैपासून एकविरा चौक, पाइपलाईन रोड आणि कोल्हे मळा रोड येथील तीन ठिकाणी सुरू होणार आहे. शिबिर १५ दिवस व ७ दिवस अशा दोन प्रकारांमध्ये सातत्याने चालणार आहे, अशी माहिती प्रशिक्षिका मानसी देठे यांनी दिली.
मंगलागौर शिबिरात महिलांना पारंपरिक नृत्य, गाणी, खेळ याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांनी आपले छंद जोपासण्याबरोबरच महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या शिबिरात गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला तसेच मुलींसाठी सायंकाळी विशेष वेळ ठेवल्याने त्यांना सहभागी होणे शक्य होणार आहे. प्रशिक्षिका मानसी देठे यांनी सर्व महिला वर्गाला आवाहन केले आहे.
