अण्णाभाऊंनी साहित्याच्या जोरावर जागतिक पातळीवर महाराष्ट्राची कीर्ती उंचावली – प्रकाश थोरात
अहमदनगर – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शहरात आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय बहुजन सभेचे प्रकाश थोरात, रयत बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ना.म. साठे, बहुजन परिषदेचे शहराध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस संतोष साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे विजय वडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना प्रकाश थोरात म्हणाले की, “साहित्याच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे अण्णाभाऊ साठे यांनी रशियातील लेनिन चौकात शिवछत्रपतींचा पोवाडा गाऊन महाराष्ट्राची कीर्ती जगभर पसरवली. त्यांच्या साहित्याचे 28 भाषांमध्ये अनुवाद झाले असून, ते जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते.”
प्रा. नामदेव साठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अण्णाभाऊ साठे यांनी लेखन आणि पोवाड्यांद्वारे उपेक्षित, वंचित, कामगारांचे जीवन वास्तवदर्शीपणे रेखाटले असून त्यांच्या वेदनांना साहित्यातून आवाज दिला.” कार्यक्रमाच्या प्रारंभी संदीप पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
