अनिल घाटविसावे प्रतिनिधी अहिल्यानगर:- “भारतीय लोकशाही आज जनतेसाठी नव्हे, तर सत्तेसाठी चालते आहे. तिचं अधिष्ठान सेवा नाही, तर ‘सत्ता, संपत्ती आणि सन्मान’ या त्रिसूत्रीवर टिकलेलं आहे,” अशा शब्दांत अॅड. कारभारी गवळी यांनी भारतीय राजकारणातील गढूळ वास्तवावर परखड भाष्य केलं.
त्यांनी मांडलेली संकल्पना म्हणजे ‘ग्रॅव्हिटी राज’ – सत्तेच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाचं वास्तव दर्शवते. त्यांनी स्पष्ट केलं की, “ही नवी राजकीय गुरुत्वाकर्षण शक्ती लोकशाहीला अधोगतीकडे नेत आहे.”या त्रिसूत्रीचा विध्वंसक प्रभाव म्हणजे सत्ता ही लोककल्याणा ची जबाबदारी नसून सत्ता टिकवण्याचं साधन बनली आहे.
संपत्ती – राजकारणात भ्रष्ट मार्गाने मिळवलेली श्रीमंती ही प्रतिष्ठेचं प्रतीक झाली आहे. तर सन्मान – कार्यातून नव्हे, तर धर्म, जात, प्रसिद्धी वा पैशाच्या बळावर खरेदी केला जातो आहे. असा आरोप गवळी यांनी केला आहे. “लोकशाहीचे मुखवटे घालून हुकूमशाहीची साधने वापरणाऱ्या पुढाऱ्यांची ही खेळी आहे,” असे गवळी म्हणाले. यामुळे कारणांमुळे आज सामान्यांचा लोकशाहीवरील विश्वास उडतो,निसर्गाची गळचेपी होते, शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित राहिले असूनगु न्हेगारी प्रवृत्ती सत्तेत येत आहे आणि संवेदनशीलता हरवत चालली आहे.
या सर्वांवर एकच उपाय आहे लोक भज्ञाशाहीअॅड. गवळी यांनी याविरोधात “LOKBHADNYAK SHAHI” (लोकभज्ञाकशाही) या नव्या राजकीय प्रवाहाची संकल्पना मांडली असून लोकभक्ती- सत्ता म्हणजे सेवा ज्ञानभक्ती निर्णय हे एकात्म ज्ञानावर आधारित कर्मभक्ती नि:स्वार्थ कृती निसर्गपालन हे प्रत्येक धोरणात निसर्गस्नेही दृष्टिकोन आहे.
