भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे:-पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी

प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य समाचार, दि. २ ऑगस्ट २०२५ |:- “माहितीचा महासाठा असूनही जर समाजात स्वतंत्र विचार, विवेक आणि मानवी चेतनाच उरलेली नसेल, तर अशी व्यवस्था ही ‘ब्लॅक होल संस्कृती’ ठरते,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
चीनमधील माहिती नियंत्रणाच्या एकाधिकारशाही पद्धतीवर भाष्य करताना ॲड. गवळी म्हणाले की, “आज चीनमध्ये नागरिकांच्या निर्णयक्षमता, विचारस्वातंत्र्य आणि मानवी भावनांना बाजूला सारून माहितीचा ताबा सत्तेच्या हाती देण्यात आला आहे. ही स्थिती आपल्या भावी पिढ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.”
चेतना ही एक हरवलेली ‘बोंसाय’ मानवताअसून एकात्म ज्ञानसिद्धांत (Integrated Knowledge Theory – IKT) या नव्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ देताना ॲड. गवळी म्हणाले, “आज चीनमध्ये ‘बोंसाय’ मानव घडवला जात आहे — दिसायला प्रगत, पण आतून छाटलेली आणि मर्यादित चेतना असलेली व्यक्ती. ही केवळ राजकीय व्यवस्थेची समस्या नसून, ती माणूसपणाच्या मुळावर घाव आहे.”
लोकशाही समाजासाठी चेतना आवश्यक असून“लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही, तर ती माणसाच्या स्वतंत्र विचारांची, मूल्यांची आणि विवेकाची रचना आहे. जिथे माहितीचा वापर नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो, तिथे चेतनेची हत्या होते,” असे सांगून ॲड. गवळी यांनी असा इशारा दिला की भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे.
प्रगतीसाठी स्वतंत्र चेतनेचा मार्ग आवश्यक आहे.“चीन महासत्ता होईल कदाचित, पण जर ती चेतना आणि माणूसपण नष्ट करून उभी राहत असेल, तर ती सत्तेची नव्हे तर आत्म्याची माघार आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले. “ब्लॅक होल संस्कृती ही मानव चेतनेची सावली आहे. आपल्याला हवी आहे एक उज्वल, सृजनशील आणि लोकाभिमुख चेतना.”
