
अहिल्यानगर (प्रतिनिधी) — डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी, या सामाजिक संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब गायकवाड यांचा ५३ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मार्केट यार्ड, अहमदनगर येथे संपन्न झाला.
या प्रसंगी अण्णासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, संजय देवढे, अनिल घाटविसावे, प्रदीप पवार, सलीमभाई शेख, रामभाऊ वाघ, विठ्ठल भिंगारदिवे, नितीन गायकवाड, सुभाष गायकवाड, सुभाष आल्हाट, मिलिंद आंगरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजकार्यातील योगदान, संघटनात्मक कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार यासाठी अण्णासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या सेवेला उपस्थितांनी गौरविले. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी आणि एकतेच्या वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
