शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा दिमाखात संपन्न!
महाराष्ट्र राज्य समाचार/अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- समाज परिवर्तनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवाचा १६ वा राज्यस्तरीय वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ सोहळा अहिल्यानगर येथे उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या वेळी लोकांना संबोधित करतांना ते म्हणाले “पत्रकारिता ही केवळ बातम्या पोहोचवण्याचे माध्यम नसून ती समाजाला दिशा देणारी शक्ती आहे” सजग, निर्भीड आणि सकारात्मक पत्रकारितेमुळे ग्रामीण भागात जागृती निर्माण होते, विकासाला चालना मिळते आणि शासनाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचते.
या भव्य कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक मा. रमेश जेठे (सर) यांनी अत्यंत सौजन्यपूर्ण, नेटके आणि ध्येयवादी पद्धतीने केले. कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मान्यवर आणि विविध क्षेत्रातील तज्ञ व सामाजिक योगदान करणाऱ्या व्यक्तींची उपस्थिती हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. या गौरवशाली सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिवरे बाजारचे आदर्श सरपंच, पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ग्रामविकासाची दिशा बदलली आहे. त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित असलेल्या जेष्ठ पत्रकार मा. मनोजकुमार शंकरराव आगे, २५ डिग्री प्राप्त डॉ. बबन जोगदंड, साहित्यसम्राट टि.एस. चव्हाण, नगरसेवक नितीन वाघमारे (लातूर) व सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे यांचाही मान्यवर म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात २९ समाजहितैषी व्यक्तींना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने सन्मानित करण्यात आले. हे सर्व मानकरी विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे दीपस्तंभ असून त्यांचे कार्य समाजासाठी दीपमाळ ठरत आहे. साहित्य, समाजसेवा, शिक्षण, पत्रकारिता, कृषी, विज्ञान, युवा नेतृत्व अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमात चारचाँद लागले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात जे मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या उल्लेखाशिवाय हा सोहळा अपूर्ण ठरेल.
भरत विटकर, सदाशिव जाधव, कर्नल ऋषिकेश धोत्रे, अभिनेता राजेश ननवरे, अभिनेत्री कीर्ती पवार, संदिप कुसळकर,भोरू मस्के,शाम विटकरी ,सुरेश विटकर,चंद्रकांत शहासने, ललित गुंदेचा, धर्मात्मा मिश्रीममल मुथ्था, रवि शिंदे ,सोलापूर अप्पासाहेब ढूस, राजकुमार आघाव, रामचंद्र मंजुळे, विष्णू पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू ननवरे, दिपक मेढे,किरण तागडकर, सागर धनवटे, मोहन गायकवाड, नितीन शेलार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकों मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *शौकतभाई शेख*, शिवाजी ननवरे,विशाल जेठे, हरिष बंडीवडार, डाॅ.सुहास पाखरे सर, निरज जेठे व शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा परिवाराने परिश्रम घेतले, या सोहळ्याला मिळालेला सिनेमा पुरस्कार वितरणासारखा देखणा आणि मंत्रमुग्ध करणारा साजशृंगार पाहून सर्वच उपस्थित रसिक थक्क झाले. अहिल्यानगरच्या मातीवर अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच झाले होते – आणि तेही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरल्या जाईल अशा पद्धतीने! कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण हा सामाजिक एकतेचा, योगदानाचा आणि प्रेरणेचा उज्ज्वल दीप ठरला. शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवाने समाजप्रबोधन, सकारात्मक पत्रकारिता व लोकसेवेच्या कार्यास कटिबद्ध राहण्याची नव्याने शपथ घेतली. सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले.
