Homeदेश-विदेशनिसर्ग श्रीमंत भारतीय योजना संपूर्ण क्रांतीचा दीपोत्सव

निसर्ग श्रीमंत भारतीय योजना संपूर्ण क्रांतीचा दीपोत्सव

ग्लोबल दिवाळी ब्लिस निमित्त पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांचा संदेश

अहिल्यानगर दि. 23 ऑक्टोबर (प्रतिनिधी): आजच्या ग्लोबल दिवाळी ब्लिस निमित्ताने पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने “निसर्ग श्रीमंत भारतीय योजना” या नवयुगीन व परिवर्तनकारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर मानवाच्या संपूर्ण चेतनात्मक क्रांतीचा आरंभ आहे, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांनी केले.

ॲड.गवळी म्हणाले, “निसर्ग श्रीमंत भारतीय योजना ही निसर्गाशी एकरूप होण्याची आणि टिकाऊ, आत्मनिर्भर जीवनशैली अंगीकारण्याची दिशा आहे. ही योजना त्या प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आहे जो निसर्गाला केवळ संसाधन म्हणून नव्हे, तर चेतनस्वरूप सखा म्हणून पाहतो.”

निसर्ग श्रीमंत भारतीय कोण? निसर्ग श्रीमंत भारतीय तो आहे. जो किमान पाच झाडांची लागवड करतो व प्रत्येक झाडाजवळ रेन गेन बॅटरी बसवतो, ज्यामुळे भूजलपातळी वाढते. आपल्या परिसरात नॅनो धनराई नर्सरी स्थापन करतो जी स्वावलंबन व पर्यावरणसंवर्धनाचे प्रतीक आहे.

सौर नॅनो ऊर्जा प्रणाली बसवून, विद्युत वाहनांचा वापर करतो व पेट्रोल-डिझेलमुक्त भारत घडवतो. घराभोवती हरितावरण राखतो, हवेचा, ध्वनीचा व मानसिक प्रदूषण टाळतो.सर्व सजीवांना नात्यातील भावनेने वागवतो, कारण प्रत्येक जीवात त्या विश्वचेतनेचा अंश आहे.

नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय टाळतो व टिकाऊ जीवनशैली स्वीकारतो. संपूर्ण क्रांतीचे तीन आधारस्तंभ म्हणजे भौतिक परिवर्तन – झाडे, जलसंधारण, सौरऊर्जा, व हरित जीवनशैली.मानसिक परिवर्तन – प्रेम, शांतता, आत्मसंयम, आणि वादमुक्त समाज.चेतनात्मक परिवर्तन – एकात्मिक ज्ञानसिद्धांत (IKT), सूक्ष्म चेतनेचा विकास आणि कार्यक्षम अध्यात्म.

ॲड.गवळी यांनी सांगितले की, “हीच ती संपूर्ण क्रांती — जी शरीर, मन आणि चेतना या त्रिसूत्रीवर आधारित आहे. ही क्रांती राजकीय किंवा आर्थिक नसून अंतर्मनातून उगवलेली सामाजिक क्रांती आहे.”

निसर्गपाल भावनेचा जयघोष “जो मनुष्य निसर्गपाल बनतो, तो केवळ पर्यावरण वाचवत नाही, तर जीवनाचे खरे अध्यात्म अनुभवतो,” असे ॲड.गवळी म्हणाले.

तो ‘मी’ आणि ‘माझे’ या सीमांपलीकडे जाऊन सर्वांसाठी कार्य करतो आणि निसर्गपाल धर्म स्वीकारतो — जो शोषण, अहंकार आणि संकीर्णतेच्या पलीकडे आहे.

अंतिम संदेश देतांना ॲड. कारभारी गवळी यांनी शेवटी आवाहन केले“ही दिवाळी केवळ दिव्यांची नाही, तर चेतनेच्या प्रकाशाची दिवाळी असावी.आपल्या अंतःकरणातील प्रकाशाला जागवून आपण म्हणूया —मीच निसर्ग आहे, मीच शक्ती आहे, मीच प्रकाश आहे.

जय निसर्गपाल। जय वंदे मातरम्। शुभ ग्लोबल दिवाळी ब्लिस!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

error: Content is protected !!