
अहिल्यानगर – काँग्रेस पक्षाचे कुशल संघटक व निष्ठावान कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळासाहेब भंडारी यांची अहिल्या नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
भंडारी हे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडलेले असून त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रामाणिक, संयमी आणि संघटनक्षम कार्यशैलीमुळे पक्षातील सर्व स्तरांवर त्यांना आदर मिळाला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष श्री. दीप चव्हाण, श्री निजामभाई जहागीरदार, यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनीही बाळासाहेब भंडारी यांच्या निवडीचे स्वागत करत, काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे पाऊल मोलाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
