Homeताज्या बातम्याअण्णा भाऊ साठे एक लोक शिक्षणाचे विद्यापीठ :-बौधचार्य अण्णा साहेब गायकवाड

अण्णा भाऊ साठे एक लोक शिक्षणाचे विद्यापीठ :-बौधचार्य अण्णा साहेब गायकवाड

अहिल्यानगर येथे अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन साजरा

अहिल्यानगर/ अनिल घाटविसावे : तमाम सर्वसामान्य , वंचित, उपेक्षित आणि कष्टकरी समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या अण्णा भाऊ साठे यांना “लोक शिक्षणाचे विद्यापीठ” म्हणणे म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पावती देणे होय. समाजसुधारणेच्या आणि श्रमिक वर्गाच्या संघर्षाचे ज्वलंत प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये पहायला मिळते. असे उदगार भारतीय बौद्ध महा सभेचे केंद्रीय शिक्षक अण्णा साहेब गायकवाड यांनी काढले.

अण्णा भाऊ साठे यांनी “अखंड समाज परिवर्तनाचे कार्य” आपल्या सशक्त लेखणी आणि अमोघ वक्तृत्वाने केले. शिक्षण, समता, न्याय आणि स्वाभिमान ही त्यांच्या विचारांची गाभा होती. त्यांनी लिहिलेली “फकिरा” आजही समाजमनावर अधिराज्य गाजवत आहे असे गायकवाड यांनी सांगितले.

साहित्य हे केवळ उच्चभ्रू वर्गापुरते मर्यादित नसावे, तर ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, या तत्वावर त्यांनी आपल्या लेखणीचे कार्य केले. शालेय शिक्षण अपुरे असूनही त्यांनी समाजात शिक्षणाचा दीप लावला आणि लोकजागृती घडवून आणली. आजही त्यांच्या साहित्याचा अभ्यास विद्यापीठांमध्ये होतो, आणि अनेक अभ्यासक त्यांच्यावर( पी एच डी) शोध प्रबंध लिहित आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने “अण्णा भाऊ साठे महामंडळ” स्थापन करून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. अण्णा भाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते, ते एक संपूर्ण विद्यापीठ होते, समाजाचे विद्यापीठ, जे आजही अनेकांना दिशा देत आहे.या कार्यक्रम प्रसंगी अनिल घाटविसावे, मिलिंद आंग्रे, विशाल माळवे, दशरथ घाटविसावे, संजय देवढे, आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले कि,फकिरा ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली एक अत्यंत प्रसिद्ध आणि क्रांतीकारी कादंबरी आहे. दलित, वंचित आणि श्रमिक समाजाच्या जीवनाचे वास्तवदर्शी आणि स्फोटक चित्रण करणारी ही कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णा भाऊंनी आझाद मैदानावर पंधरा हजार लोकांचा मोर्चा कडून निषेध नोंदवीला आणि उपेक्षिताना नेतृत्व दिले असे सांगून “ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है.”ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांची आणि विद्रोही,झणझणीत अभिव्यक्ती होती. “ये आज़ादी झूठी है…” – एका क्रांतीचा हुंकार स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीही गरीब, दलित, श्रमिक, भटक्या समाजाला मूलभूत हक्क आणि मानवी सन्मान मिळाला नाही, हे अण्णा भाऊ साठेंना प्रकर्षाने जाणवले. म्हणून त्यांनी रंगभूमी, पोवाडे, लोकनाट्यं आणि काव्यफॉर्ममधून अत्यंत प्रभावीपणे हा आक्रोश व्यक्त केल्याची बौधचार्य अण्णा साहेब गायकवाड यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

error: Content is protected !!