अहिल्यानगर प्रतिनिधी :-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांचा सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल लसगरे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी लोंढे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी राजेश भाटिया, प्रवीण शेळके, नरेश बगळे, गणेश लवाळे आणि सचिन कुक्कडवाल आदी उपस्थित होते. नगर शहराचा विकास आधुनिक आणि निसर्गपूरक पद्धतीने व्हावा, तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
