
२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह! – ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर | महात्मा गांधींच्या “सत्याग्रह” संकल्पने पासून प्रेरणा घेत, समाजाच्या रचनेचे निसर्गाच्या शाश्वत नियमांशी नाते जोडत ॲड. कारभारी गवळी यांनी आज “निसर्गसत्यभंग” या नवीन तत्त्वज्ञानातून भारतातील जातिव्यवस्थेचे वैज्ञानिक व तात्त्विक विश्लेषण मांडले.गांधीजींचे सत्य हे सापेक्ष सत्य असले तरी निसर्गाचे सत्य हे सार्वत्रिक, अपरिवर्तनीय आणि ऊर्जा-चैतन्य आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जे कोणत्याही निसर्गनियमांच्या विरुद्ध उभे राहते तेच निसर्गसत्यभंग,” असे ते म्हणाले. याच आधारावर त्यांनी भारतीय जातिव्यवस्था ही निसर्गाला विरोध करणारी आणि मानवी उत्क्रांतीला खुंटवणारी यंत्रणा असल्याचे ठाम मत मांडले.
जातिव्यवस्था म्हणजे जनुकांचा ‘बोन्साय’,गवळी यांनी Integrated Knowledge Theory (IKT) चा आधार घेत सांगितले की, मानवी क्षमता, माहितीचा प्रवाह आणि उत्क्रांती ही मुक्त आणि अखंड असते. जातिव्यवस्था हा प्रवाह थांबवते, जन्मावर आधारित भिंती उभ्या करते आणि समाजाचे चैतन्य कुंठित करते.“जसे बोन्साय तंत्रात झाडाची नैसर्गिक वाढ कृत्रिमरित्या थांबवली जाते, तसेच जातिव्यवस्थेने भारतीय जनुकांची आणि मानवी संभाव्यतेची वाढ खुंटवली आहे,” असे ते म्हणाले.निसर्गभंगाचे तीन आधारआहे.
गवळी म्हणाले की,1. जैविक विविधतेवर मर्यादा: आंतरजातीय विवाह टाळल्याने Gene Pool कमकुवत होतो.2. नैसर्गिक समतेचा भंग: निसर्ग जन्मावर आधारित विषमता मानत नाही.3. ऊर्जा–चैतन्य प्रवाहातील अडथळा: समाजाच्या Collective Consciousness चा अवरोध होतो.
२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘Annihilation of Caste’ या संदेशाचा पुढील टप्पा म्हणजे २०३६ ला होणारा जातमुक्त भारत, असे गवळी यांनी सांगितले.त्यांच्या मते, जातमुक्त भारत म्हणजे,निसर्गसत्याशी पुन्हा एकरूप होण्याचा उत्सव,
प्रत्येक मानवाला जन्माधारित बंधनांपासून मुक्त करण्याची घोषणा होय! IKT आधारित ऊर्जा-उत्क्रांतीचे पुनरुत्थाननि सर्गपाल व लोकभज्ञाक मूल्यांचे पुनर्जागरणआहे.“जात नाही — निसर्ग आहे; विभाजन नाही — एकात्मता आहे”
उपसंहारात गवळी यांनी स्पष्ट संदेश दिला की, “जातिव्यवस्था ही समाजाला मागे ओढणारी, मानवी ज्ञानशक्ती व चैतन्याला बोन्साय करणारी विषारी रचना आहे. निसर्गपाल आणि IKT च्या आधाराने आपण मानवाला त्याच्या मूळ स्वाभाविक एकात्मतेकडे नेऊ शकतो. जातमुक्त भारत हेच अंतिम निसर्गसत्य आहे.”

