
मानवकेंद्रित आणि निसर्गसुसंगत विकासाची दिशा – ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर : प्रतिनिधी/आजच्या काळात सामाजिक विषमता, आर्थिक असमतोल, पर्यावरणीय संकट आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास या समस्या जगासमोर गंभीर स्वरूपात उभ्या आहेत. या सर्व प्रश्नांना व्यापक व मानवी मूल्यांवर आधारित उत्तर देण्यासाठी “Reconscio Governance” ही नवी वैचारिक संकल्पना पुढे येत असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
ॲड. गवळी यांच्या मते “Reconscio Governance” म्हणजे केवळ राजकीय सत्ता किंवा प्रशासन चालविण्याची पद्धत नसून स्वतःच्या विवेकावर आणि अंतर्मनातील नैतिक शिस्तीवर आधारित शासनव्यवस्था होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या विचारांवर, कृतीवर आणि जबाबदारीवर नियंत्रण ठेवून समाजहिताला प्राधान्य दिले तरच खऱ्या अर्थाने न्याय्य व समताधिष्ठित समाजरचना उभी राहू शकते.
या संकल्पनेत भारतीय व जागतिक विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषत: महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडलेली सामाजिक समतेची व शिक्षणाच्या प्रसाराची भूमिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाधिष्ठित सामाजिक न्यायाचा मार्ग, महात्मा गांधी यांनी मांडलेली अहिंसा, सत्य आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना, तसेच कार्ल मार्क्स यांनी मांडलेले आर्थिक समतेचे तत्त्वज्ञान या सर्व विचारधारांचा या संकल्पनेत समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आधुनिक पर्यावरणवादी विचार, निसर्गसंवर्धन आणि शाश्वत विकास यांनाही या संकल्पनेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.गवळी यांनी सांगितले की, आजच्या काळात विकासाची संकल्पनाया संकल्पनेत भारतीय व जागतिक विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गवळी यांनी सांगितले की, आजच्या काळात विकासाची संकल्पना केवळ आर्थिक वाढ किंवा तांत्रिक प्रगतीपुरती मर्यादित ठेवणे धोकादायक ठरू शकते. विकास हा मानवकेंद्रित आणि निसर्गसुसंगत असला पाहिजे. मानवी जीवनाचा दर्जा सुधारताना पर्यावरणाचा समतोल राखणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ही विकासाची मूलभूत तत्त्वे असली पाहिजेत.
“Reconscio Governance” या संकल्पनेत ज्ञान, विवेक, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. समाजातील व्यक्ती, शासनव्यवस्था आणि विविध संस्था या सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यासच समाजातील विषमता आणि अन्याय कमी होऊ शकतो. शासन आणि समाज यांच्यातील विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे हे या संकल्पनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे गवळी यांनी स्पष्ट केले.
तसेच पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्जन्य व्यवस्थापन, जलसंधारण, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, आणि स्थानिक संसाधनांवर आधारित विकास या बाबींना प्राधान्य दिल्यास शाश्वत विकासाचा मार्ग अधिक मजबूत होऊ शकतो.
गवळी यांच्या मते, आजच्या काळात समाजात विचारांचे ध्रुवीकरण वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत विविध विचारधारांमधील सकारात्मक मूल्यांचा समन्वय करून एक व्यापक व संतुलित विकासदृष्टी तयार करणे आवश्यक आहे. “Reconscio Governance” ही संकल्पना त्या दृष्टीने समाजाला नवा वैचारिक मार्ग दाखवू शकते. याकरिता ॲड. कारभारी गवळी यांचे सहकारी जातमृत्त समाज याचा पुरस्कार करणारे कॉम्रेड. बाबा आरगडे पीपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते भारतीय जनसंसद, अशोक सब्बन, सुधीर भद्रे,कैलास पठारे सरपंच ,अनिल घाटविसावे प्रकाश थोरात, संजय देवडे, संदीप पवार, सखाराम सरक सरपंच ओम कदम, ॲड.भास्कर वडावकर अशोक भोसले,ॲड.आमित थोरात आनंद राठोड, आनंदा आढाव , शाहीर कान्हूसुंबे, विठ्ठल सुरम सावकारी शोषणाविरुद्ध जन आंदोलनाचे नेते यमनाजी म्हस्के, पन्नालाल लसगरे प्रयत्नशील आहेत.
मानवी विवेक, सामाजिक समता आणि पर्यावरणीय शाश्वतता या तिन्ही घटकांचा समतोल साधणारी शासनव्यवस्था उभी राहिली तरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जग निर्माण होईल, असा विश्वास ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला.
