Homeताज्या बातम्याअदृश्य गुलामगिरीचा भंडाफोड; “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट”ची मांडणी

अदृश्य गुलामगिरीचा भंडाफोड; “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट”ची मांडणी

ब्रेकिंग न्यूज
अदृश्य गुलामगिरीचा भंडाफोड; “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट”ची मांडणीअजनुकीय माहितीची गुलामगिरी ही २१व्या शतकातील सर्वात मोठी महामारी : ॲड. कारभारी गवळीमाहिती, सामाजिक न्याय आणि माध्यमांची जबाबदारीअहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात तीव्र निषेध आंदोलनजागतिक शांततेसाठी अहिल्या नगरातून हाकजनलोक ब्रेन गेन – रेन गेन चळवळ ही भारतातील नवी लोकक्रांती : ॲड. कारभारी गवळीस्थायी समिती सभापतीपदी निवडीबद्दल सुभाष लोंढे यांचा सत्कारयूपीएससी परीक्षेत प्रेरणा खवळेचे यश; ‘आर्टी’कडून गौरवफूडिसिन पूल ही संकल्पना जनतेच्या आरोग्यासाठी प्रभावी – ॲड. कारभारी गवळी२०२३ चा Mediation Act : जनलोकअदालतसाठी ऐतिहासिक संधी — ॲड. कारभारी गवळी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचारक्रांतीची हाक!

पुणे, प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळून संविधानाने समानतेची हमी दिली असली, तरी नागरिकांचे विचार खरोखर स्वतंत्र आहेत का, असा मूलभूत प्रश्न आजही कायम असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ डॉ.आंबेडकर यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. या प्रश्नाला भिडण्यासाठी “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट” हा दस्तावेज पुढे आणण्यात आला आहे.

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला हा दस्तावेज कोणताही शासकीय गॅझेट नसून समाजाचा “बौद्धिक आरसा” आणि “सामाजिक एक्स-रे अहवाल” असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी स्पष्ट केले. व्यक्तींना लक्ष्य करण्याऐवजी समाजातील विचारसरणीतील दोष उघड करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

देश स्वतंत्र असला तरी निर्णयप्रक्रिया अजूनही परंपरा, भीती, अंधश्रद्धा आणि तर्कविरहित श्रद्धांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स” हीच अदृश्य गुलामगिरी असून ती मानवी मन, निर्णय आणि स्वातंत्र्याच्या भासावर प्रभाव टाकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, जातिव्यवस्था आणि अन्यायाविरुद्धचा लढा आजही संपलेला नाही. केवळ कायदे करून समाजपरिवर्तन होत नाही, तर विचारांची शुद्धी आवश्यक आहे. हीच खरी जयंतीची दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सबकॉन्शिओ गव्हर्नन्स कशी कार्य करते याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जातीय मानसिकता, अंधश्रद्धा, भीतीवर आधारित परंपरा आणि तर्कशून्य श्रद्धा या सर्व अजनुकीय माहितीचे (NGI) परिणाम आहेत. यामुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर नियंत्रण येते आणि स्वातंत्र्य केवळ भास बनून राहते.

नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य करताना अ‍ॅड. गवळी म्हणाले की, हा दस्तावेज कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवतो. जेव्हा नेतृत्व तर्कशक्तीऐवजी भावना भडकवते आणि स्वार्थासाठी कार्य करते, तेव्हा शासनातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि निष्क्रियता वाढते.

“ब्लॅक गॅझेट” हा अंधाराचा नव्हे, तर प्रकाशाचा घोष असल्याचे सांगत त्यांनी RECONSCIO गव्हर्नन्स ही पुढील दिशा असल्याचे नमूद केले. यामध्ये एकात्मिक ज्ञान सिद्धान्त (IKT), अजनुकीय माहितीचे परिवर्तन आणि विवेकाधारित निर्णयप्रक्रिया यांचा समावेश आहे.

डॉ. आंबेडकर जयंती हा केवळ अभिवादनाचा दिवस नसून विचारक्रांतीची सुरुवात असल्याचे सांगत त्यांनी आवाहन केले की, “समजा — तपासा — सुधारा.”

समारोप करताना अ‍ॅड. गवळी म्हणाले, “ही लढाई बाह्य शत्रूंविरुद्ध नसून आपल्या मनातील अदृश्य साखळ्यांविरुद्ध आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजनुकीय माहितीची गुलामगिरी ही २१व्या शतकातील सर्वात मोठी महामारी : ॲड. कारभारी गवळी

पुणे, प्रतिनिधी : आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली असली तरी समाजातील युद्धे, जातीय द्वेष, अंधश्रद्धा आणि पर्यावरणीय संकटे यांसारख्या समस्यांमुळे मानवजातीसमोर...

माहिती, सामाजिक न्याय आणि माध्यमांची जबाबदारी

डॉ. विजयकुमार पोटे यांचे पुस्तकावर संपादक प्रकाश थोरात यांचे मत. महाराष्ट्र राज्य समाचार प्रतिनिधी: पुणे :- माध्यम क्षेत्र, सामाजिक न्याय आणि बदलत्या ग्रामीण वास्तवाचा सखोल वेध...

अहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात तीव्र निषेध आंदोलन

अहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात संतापाचा उद्रेक; दिल्लीगेटवर जोरदार निषेध आंदोलन अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मध्यपूर्वेतील युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इज्राईलविरोधात अहिल्यानगर शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. दिल्लीगेट...

जागतिक शांततेसाठी अहिल्या नगरातून हाक

युद्धाविरोधात ग्लोबल ब्रेन ड्रेन आंदोलन! -ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर | प्रतिनिधी:-अहिल्यानगर येथील दिल्ली गेट परिसरात १९ मार्च २०२६ रोजी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने...

जनलोक ब्रेन गेन – रेन गेन चळवळ ही भारतातील नवी लोकक्रांती : ॲड. कारभारी...

महाराष्ट्र राज्य समाचार/अहिल्यानगर :- समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास,पाणीटंचाई आणि हवामान बदल या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून “जनलोक ब्रेन...

error: Content is protected !!