Homeताज्या बातम्याअहिल्यानगरमध्ये आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

अहिल्यानगरमध्ये आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

ब्रेकिंग न्यूज
अदृश्य गुलामगिरीचा भंडाफोड; “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट”ची मांडणीअजनुकीय माहितीची गुलामगिरी ही २१व्या शतकातील सर्वात मोठी महामारी : ॲड. कारभारी गवळीमाहिती, सामाजिक न्याय आणि माध्यमांची जबाबदारीअहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात तीव्र निषेध आंदोलनजागतिक शांततेसाठी अहिल्या नगरातून हाकजनलोक ब्रेन गेन – रेन गेन चळवळ ही भारतातील नवी लोकक्रांती : ॲड. कारभारी गवळीस्थायी समिती सभापतीपदी निवडीबद्दल सुभाष लोंढे यांचा सत्कारयूपीएससी परीक्षेत प्रेरणा खवळेचे यश; ‘आर्टी’कडून गौरवफूडिसिन पूल ही संकल्पना जनतेच्या आरोग्यासाठी प्रभावी – ॲड. कारभारी गवळी२०२३ चा Mediation Act : जनलोकअदालतसाठी ऐतिहासिक संधी — ॲड. कारभारी गवळी
महिला सशक्तीकरण, शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश;समाजकार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान!
अहिल्यानगर /प्रतिनिधी-दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. समाजातील महिलांना प्रोत्साहन देणे, स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विभागातील मा. अरुणाताई पारधे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मा. वसंतराव पारधे,पोलीस उपनिरीक्षक मा. मन्सूर सय्यद, बांधकाम विभागातील अभियंता मा. पुनम प्रकाश थोरात तसेच महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग कार्यालयातील अवैद्यकीय सहाय्यक मा. सुनील पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.अरुणाताई पारधे यांनी महिलांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत स्त्रियांसाठी शिक्षण हा मूलभूत मानवी अधिकार असल्याचे सांगितले. स्त्री शिक्षणामुळे समाजात समानता, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्योतीराव फुले यांनी अहमदनगर येथे मिशनरी शिक्षिका मिस फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती. तेथील शिक्षणपद्धती पाहून ते प्रभावित झाले आणि त्यातूनच पुढे पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्या शाळेत शिक्षणासाठी पाठवले आणि स्त्री शिक्षणाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक मन्सूर सय्यद यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरणाचे महत्त्व विशद केले. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि कायद्याचे ज्ञान यांच्या आधारे सक्षम बनण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान फाउंडेशनच्या संस्थापक सदस्य कुंदबाला मोहन गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. मनीषा लक्ष्मण यांनी महिलांना मार्गदर्शनपर प्रेरणादायी भाषण करून आरोग्य, स्वावलंबन आणि जागरूकतेविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले.

या कार्यक्रमात संस्थेमार्फत स्वावलंबी बनविलेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. तसेच स्लम परिसरात कार्यरत स्नेहालय संचालित बालभवन येथील समाजसेविका महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच सर्वांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले.या वेळी आयडियाल हेल्पिंग हँड फाउंडेशन चे पदाधिकारी कार्यकर्ते मिस निर्मला केदारी, मनीषा शिंदे, , उज्वला गायकवाड, शिवाजी जाधव,वैशाली पार्ले,प्रशांत भोंग ,सुनील बोर्डे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संस्थेने गेल्या पाच वर्षांत मुलींना कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि सामाजिक पाठबळ देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकाश थोरात व डेव्हिड अवचित यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या प्रमुख निर्मला केदारी यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अदृश्य गुलामगिरीचा भंडाफोड; “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट”ची मांडणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचारक्रांतीची हाक! पुणे, प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळून संविधानाने समानतेची हमी दिली असली, तरी नागरिकांचे विचार खरोखर स्वतंत्र आहेत का, असा...

अजनुकीय माहितीची गुलामगिरी ही २१व्या शतकातील सर्वात मोठी महामारी : ॲड. कारभारी गवळी

पुणे, प्रतिनिधी : आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली असली तरी समाजातील युद्धे, जातीय द्वेष, अंधश्रद्धा आणि पर्यावरणीय संकटे यांसारख्या समस्यांमुळे मानवजातीसमोर...

माहिती, सामाजिक न्याय आणि माध्यमांची जबाबदारी

डॉ. विजयकुमार पोटे यांचे पुस्तकावर संपादक प्रकाश थोरात यांचे मत. महाराष्ट्र राज्य समाचार प्रतिनिधी: पुणे :- माध्यम क्षेत्र, सामाजिक न्याय आणि बदलत्या ग्रामीण वास्तवाचा सखोल वेध...

अहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात तीव्र निषेध आंदोलन

अहिल्यानगरात अमेरिका–इज्राईलविरोधात संतापाचा उद्रेक; दिल्लीगेटवर जोरदार निषेध आंदोलन अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मध्यपूर्वेतील युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इज्राईलविरोधात अहिल्यानगर शहरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. दिल्लीगेट...

जागतिक शांततेसाठी अहिल्या नगरातून हाक

युद्धाविरोधात ग्लोबल ब्रेन ड्रेन आंदोलन! -ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर | प्रतिनिधी:-अहिल्यानगर येथील दिल्ली गेट परिसरात १९ मार्च २०२६ रोजी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने...

error: Content is protected !!