मुलींमध्ये प्रथम क्रमांक ! राज्यात गौरव! अभिनंदन!

पुणे/ महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कु. श्रद्धा सौदागर टोंपे हिने पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश संपादन केले आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने आपल्या प्रतिभेची तेजस्वी छाप उमटवली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील रहिवासी असलेल्या श्रद्धा हिचे शैक्षणिक यश अधिक उल्लेखनीय आहे. तिचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपविभाग, परांडा येथे कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले असून त्यांच्या संस्कारांची व परिश्रमाची ही फलश्रुती असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केवळ 22 व्या वर्षी कु. श्रद्धा टोंपे हिची उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या अलौकिक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इंजी. कु. प्रेरणा थोरात, इंजि. कु. संध्याराणी काळे, इंजि. दिशा देडगे, इंजि. मयुरेश कुंजीर आदींनी श्रद्धाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. श्रद्धा टोंपे हिने दाखविलेल्या मेहनतीची आणि प्रतिभेची दखल घेत सर्वजण तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत. तिच्या यशामुळे परांडा तसेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

कु. श्रद्धा आपले वडील श्री. टोम्पे व आई बरोबर.

