
राहुरी प्रतिनिधी :- येथील सामाजिक कार्यकर्त्या आदर्श माता सुलाबाई काकडे या एक आदर्श जीवन जगणाऱ्या व शिक्षणाची जाण असणाऱ्या उपेक्षित समाजातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या.पतीच्या अचानक जाण्याने कुटुंबाची सर्व जबादारी स्वीकारून आपल्या मुला बरोबरच, लोकांच्या जीवनात अडचणीत धावून जाणाऱ्या, मदत करणाऱ्या त्या एक सामाजिक जाणीव असणाऱ्या आदर्श कार्यकर्त्या होत्या. त्यांचा प्रवास अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव,श्रीरामपूर, नगर व शेवटी राहुरी येथे थांबला.
त्यांच्या दशक्रिया कार्यक्रमाचे निमित्ताने हरिभक्त परायण सचिन महाराज आश्वीकर यांनी आपल्या सात्विक वाणीतून ज्ञानेश्वराच्या अभंगा द्वारे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, ते म्हणाले “उपजे ते नासे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे, परिभ्रमे गा” या ज्ञानेश्वरीतील अभंगाचा अर्थ आहे की, जे काही उत्पन्न होते, ते नष्ट होते, आणि जे नष्ट होते, ते पुन्हा उत्पन्न होते. हा निसर्गाचा नियम आहे.राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सीडी देशमुख लॉ कॉलेजचे प्रमुख प्रा.ना.म. साठे यांनी श्रद्धांजलीपर बोलताना सांगितले सामाजिक व्यवस्थेने नाडलेल्या गावकुसाबाहेरील सुलाबाईचे जीवन हे उपेक्षित लोकांसाठी प्रेरणा देणारे आहे. चंद्रकांत कांबळे यांनी श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले घड्याळात सुई फिरत राहते आणि तास आणि मिनिटे बदलत राहतात, पण घड्याळ स्वतः कायम राहते.तसे सुलाबाई यांच्या आठवणी कायम राहतील. यावेळी प्रकाश थोरात, प्रा काळुराम बोरुडे, बाळासाहेब साळवे नाशिक, भास्कर जगधने, अवी साळवे (नाशिक ) कैलास साळवे (नाशिक ), प्रा.अरुण बोरुडे,बाबासाहेब ससाने, भास्कर साळवे, आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
