
(मंत्री घोलप साहेब यांचा सत्कार अण्णा साहेब गायकवाड मा. आमदार भाऊ साहेब कांबळे, सुदाम कांबळे, शिवाजी साळवे आणि कार्यकर्ते)
डॉ. आंबेडकर यांचे कार्य सांगून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
अहिल्यानगर:- येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष सुदाम कांबळे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी साळवे होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक अण्णासाहेब गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीतील सत्याग्रहांचे दाखले देत संघर्षातून समाज करण्याचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात बोलताना बबनराव घोलप यांनी कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडून संघटितपणे काम करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
तसेच घोलप यांनी सर्व समाजाबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून काम करण्यावर भर दिला. समाजाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देऊन बदल घडवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला,
या मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक अण्णासाहेब गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीतील सत्याग्रहांचे दाखले देत संघर्षातून समाज करण्याचे महत्व अधोरेखित केले.
अण्णासाहेब गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधोरेखित करताना सांगितले की, “खरा कार्यकर्ता तोच जो स्वतःचे कुटुंब सांभाळतो, मुलांना शिक्षण देतो आणि घराची जबाबदारी सांभाळून समाजकार्यात सक्रिय राहतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारा कार्यकर्ता शेवटी कंगाल होतो व विरोधकांकडे विकला जाऊन नेत्यांचा गुलाम बनतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने व आत्मसम्मानाने कार्य केले तरच त्याला खरे यश प्राप्त होते.”
