
खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
या वेळी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार लंके यांनीही उपस्थित राहून महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
पुष्पहार अर्पण करताना खासदार लंके म्हणाले, “आंबेडकर विचार हेच राष्ट्रबांधणीचे खरे सामर्थ्य आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची वाट दाखवणारी आंबेडकरी चळवळच समाजाला खरी उन्नतीची दिशा देते.” त्यांनी बाबासाहेबांचे योगदान राष्ट्राच्या मूलभूत मूल्यांचे पायाभूत स्तंभ असल्याचे सांगितले.
या अभिवादन कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, युवक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

