पर्यावरणीय आणि नैतिक पुनर्रचनेसाठी नवे मार्ग म्हणजे रेन गेन् बॅटरी, धनराई, IKT व मायक्रो कॉन्शिओ यांच्या संकल्पनां
अनिल घाटविसावे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य समाचार सद्यस्थितीत मानवजातीसमोर दोन भीषण आव्हाने उभी ठाकली आहेत – जागतिक तापमानवाढ आणि नैतिक अधःपतन. या दुहेरी संकटावर प्रभावी उत्तर म्हणून अॅड. कारभारी गवळी यांनी मांडलेली चार संकल्पनांची चौकट आता व्यापक विचारसरणीचा भाग बनू लागली आहे:
रेन गेन् बॅटरी, धनराई, एकात्म ज्ञानसिद्धांत (IKT) आणि मायक्रो कॉन्शिओ. याचा परिणाम म्हणजे,रेन गेन् बॅटरी द्वारे पावसाचे पाणी जमिनीत! साठवले जाते, ही नाविन्यपूर्ण संकल्पना जमिनीत पावसाचे पाणी खोलवर साठवते. ५x३x३ फूट आकाराचा खड्डा खणून त्यात मुरुम आणि छोटे दगड भरले जातात. पावसाचे वाहून जाणारे पाणी या खड्ड्यात वळवून मुळांना आर्द्रता दिली जाते. यामुळे भूजल पातळी सुधारते आणि दुष्काळप्रवण भागात हरितायन निर्माण होतो असा असा श्वासत विकासाचा सिद्धांत कारभारी गवळी यांनी मांडला आहे.धनराई मुळेकोरडवाहू शेतीतून समृद्धी निर्माण होईल व मानव जात सुजलाम सुफलाम होईल.
‘धनराई’ ही संकल्पना कोरडवाहू भागात फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड रेन गेन् बॅटरी आणि सौरऊर्जेच्या सहाय्याने करण्यावर भर देते. यामुळे जलसंधारण, हरित क्षेत्र वाढ आणि स्थानिक रोजगारनिर्मिती साध्य होते. ज्यामुळे ग्रामीण भागात मोठी कृषी क्रांती होऊ शकते व यामुळे रोजगार सुशिक्षित बेरोजगारी यांचा कायमचा प्रश्न मिटेल असेअॅड. कारभारी गवळी यांनी सांगून यासाठी शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
IKT: ज्ञान, विज्ञान आणि चेतनेचा संगम हा सरकारला प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी उपयुक्त ठरेल,आणि एकात्म ज्ञानसिद्धांत (IKT) म्हणजे विज्ञान, तत्त्वज्ञान, ऊर्जाविज्ञान आणि चेतना यांचे एकत्रीकरण. यामध्ये केवळ माहिती संकलन न करता तिचे विवेकयुक्त रूपांतर कृतीत करण्याची शिकवण दिली जाते. हे शिक्षण सामाजिक व शासकीय धोरणनिर्मितीसाठी अत्यावश्यक ठरते.
Micro CONSCIO: नैतिकतेचा अंतर्मनातून जागर IKTचे वैयक्तिक रूप म्हणजे मायक्रो कॉन्शिओ म्हणजेच प्रत्येक व्यक्तीतील सूक्ष्म नैतिक जागरूकता. ही संकल्पना व्यक्तीला भ्रष्टाचार, लोभ आणि खोट्या प्रचारापासून दूर ठेवण्यास मदत करते. नैतिक पुनर्रचनेसाठी ही एक मौलिक संकल्पना म्हणून पुढे येत आहे. या यासाठी पीपल्स हेल्पलाइनचे कार्यकर्ते अशोक सब्बन कैलास पठारे प्रकाश थोरात शाहीर कानू सुंबे अशोक भोसले, संदीप, बबलू खोसला, भगवान जगताप, आनंदा आढाव,यमुना जी मस्के, अॅड.अमित थोरात, यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
लोकभज्ञाकशाही: लोकशाहीचा उन्नत पर्याय असून
सध्याच्या निवडणूक-आधारित, भ्रमात्मक लोकशाही व्यवस्थेवर ‘लोकभज्ञाकशाही’ ही एक उन्नत संकल्पना मांडली आहे. यात ‘लोक’ म्हणजे सेवा, ‘भ’ म्हणजे भक्ती, ‘ज्ञा’ म्हणजे ज्ञान, आणि ‘क’ म्हणजे कर्म. हे नेतृत्व मूल्याधिष्ठित, पारदर्शक आणि प्रामाणिक उपाय ठरेल असेही अॅड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले
निसर्गपाल आणि मानवपाल यांचा समन्वय हाच उपाय मानव जातीसाठी उपयुक्त ठरेल,
या चारही संकल्पना म्हणजे केवळ उपाय नव्हे, तर भविष्याचा मार्ग आहेत. पर्यावरणाचे संरक्षण (निसर्गपाल) आणि मानवी मूल्यांचे संवर्धन (मानवपाल) यांचा समन्वय साधल्यास शाश्वत विकास शक्य आहे, असा विश्वास अॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला.
हाच विचार आजच्या पिढीने आत्मसात केला तरच उद्याचे जग सशक्त, निसर्गस्नेही आणि नैतिकदृष्ट्या उन्नत होईल.
