अहिल्यानगर जिल्हा कार्य कारिणी कडून अभिनंदन!
अहिल्या नगर –जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये निझामभाई जहागीरदार यांची अहिल्या नगर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निझामभाई जहागीरदार हे दीर्घकाळापासून काँग्रेस पक्षाशी निगडित असून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि प्रामाणिक कार्यपद्धती यामुळे त्यांनी पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
ते “तरुण दिशा” या वृत्तपत्राचे संपादक असून एक कवी आणि साहित्यिक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. समाजप्रबोधनासाठी त्यांनी विविध लेखन व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
निझामभाई जहागीरदार यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
