Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर जातमुक्त भारत मिशन 2037 मानसिक गुलामीतून सर्वांगिण मुक्ततेची ऐतिहासिक...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातमुक्त भारत मिशन 2037 मानसिक गुलामीतून सर्वांगिण मुक्ततेची ऐतिहासिक सुरुवात आहे:- पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी

मानवी मानसक्रांती आणि एकात्मिक मानवतेची पीपल्स हेल्पलाईन ची राष्ट्रीय घोषणा!

अहिल्यानगर प्रतिनिधी:- भारताची सर्वात जुनी, सर्वात खोलवर रुजलेली गुलामी म्हणजे जातव्यवस्था. ही फक्त सामाजिक रचना नाही; ती मानवी चेतनेवर कोरलेला एक ऐतिहासिक मानसिक विषाणू आहे. हा विषाणू भीती, अभिमान, अज्ञान आणि धार्मिक विकृत कल्पनांच्या संगतीत वाढत गेला, आणि शतकानु-शतके माणसापासून माणसाला दूर करत राहिला. म्हणून भारताची खरी क्रांती केवळ राजकीय नसून मानसिक क्रांती आहे.                                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर – IKT आधारित“Caste Annihilated India Mission 2037”ही त्या मानसिक गुलामीतून सर्वांगिण मुक्ततेची ऐतिहासिक सुरुवात आहे.असे पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले आहे.जात मानवी सभ्यतेवरील मानसिक रोग असून डॉ. आंबेडकरांनी सिद्ध केले की जात ही धर्माच्या नावाखाली उभारलेली खोल अन्याय व्यवस्था आहे.IKT विज्ञानाणे सिद्ध केले आहे कि,सर्व मानवांचे 99.9% जीन समान आहेत. म्हणूनच “जात” या संकल्पनेला कोणतेही जैविक अस्तित्व आधार नाही. ती फक्त unconscious mind मध्ये बसवलेली समाजनिर्मित भ्रामक चेतना आहे.म्हणून हा चुकीचा सॉफ्टवेअर कोड बदलणे म्हणजेच मानवमन क्रांती ठरेल! असे त्यांनी महाराष्ट्र राज्य समाचार शी बोलतांना सांगितले.

 IKT — चेतना, विज्ञान आणि करुणेचा संगम असून Integrated Knowledge Theory (IKT) ही चेतनेच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक स्वभावाचा नव्या पातळीवर अभ्यास करणारी क्रांतिकारी चौकट आहे.ती सांगते कि,चेतना ही एकच सार्वत्रिक ऊर्जा आहे. सर्व जीव एकाच ईको–नेटवर्कचे घटक आहेत. विभाजन, श्रेष्ठता, जाती-भेद हे मनात तयार झालेले भ्रम आहेत. तर IKT म्हणजे आत्मज्ञान + विज्ञान + करुणा यांचे ऐतिहासिक एकत्रीकरण आहे.नवीन मनाचे शिक्षण देतांना – नवभारताचा पाया हा 2030 पर्यंत सर्व शाळा महाविद्यालयां मध्ये Integrated Knowledge Curriculum लागू होईल. विद्यार्थ्यांना शिकवले जाईल कि, “जात ही भ्रामक कल्पना आहे; आणि मानवता ही वास्तविकता आहे.”

“समता ही विज्ञानाची प्रतिज्ञा आणि आंबेडकरांचे मूलमंत्र आहे.” बालपणापासूनच “चेतनाभिमुख ओळख” तयार करणे हे या मिशनचे केंद्रस्थान असणार आहे.

ॲड. कारभारी गवळी “मी ब्राह्मण नाही, मी दलित नाही, मी NISARGPAL आहे.” ही एकात्मिक आत्मओळख राहील, ही ओळख भारताचा नवा मानवमंत्र बनेल. NISARGPAL म्हणजे जात–धर्म–वंश यापलीकडची ओळख, पर्यावरणाशी जोडलेली जबाबदारी, नैतिकता आणि वैज्ञानिक विचारांनी बांधलेली सार्वत्रिक मानवता. यावर आधारलेला नवा धर्म म्हणजे मानवधर्म.सामाजिक व्यवहारात मानसक्रांती विचारांनी नसते; ती वागण्यातून होते.वृक्षलागवड,रेन बॅटरी,पाणीसंवर्धन,ग्रामसमृद्धी अशा प्रकल्पांत सर्व जात–धर्मातील लोक एकत्र काम करतील.सामाजिक श्रमक्रांती एकात्मतेची नवीन संस्कृती घडवेल. या करिता पीपल्स हेल्पलाईन चे कार्यकर्ते अशोक सब्बन, प्रकाश थोरात, मा.सरपंच कैलास पठारे, ॲड.अमित थोरात, कान्हू सूंबे, शेतकरी संघटनेचे यमनाजी म्हस्के, पोपट गोर्डे, संदीप पवार,विरबहादूर प्रजापती, भगवान जगताप, अशोक भोसले, ओम कदम, ॲड.संजय झवेरी, ॲड.भास्करराव वडावकर आदी. आग्रही आहेत.भीती किंवा स्पर्धेऐवजी सहअस्तित्व–सहकार्य–सहानुभूती हा नवा सामाजिक स्वभाव बनवायचा आहे. शासन आणि न्यायव्यवस्था – 2032 ची रूपरेषा 2032 पर्यंत भारतात लागू होईल:Caste-Free Governance Modelजात आधारित राजकारणावर निवडणूक आयोगाची कायदेशीर बंदी Caste Discrimination Prevention Act – 2028 स्थानिक स्वराज्यात NISARGPAL नेतृत्व,शासन “बहुमतावर नाही, तर नैतिक चेतनेवर” चालणार,आर्थिक स्वातंत्र्य जातविहीन समाजाचा पाया असून IKT सांगते कि, जातीभेदाचे चे मूळ असुरक्षितता आणि दारिद्र्यात आहे. म्हणून Rain Battery Economy DhanRai (Dryland Horticulture) स्थानिक अन्न, ऊर्जा आणि जलस्वावलंबन या  योजनांनी ग्रामीण भारत आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. जेव्हा प्रत्येक घर सक्षम होईल, तेव्हा कुणालाही कोणावर श्रेष्ठत्व मिरवण्याचा अधिकार उरणार नाही.

डिजिटल चेतनायंत्रणा – AI + IKT AI च्या मदतीने:One Humanity Index – मानवसमतेचे मोजमाप,Social Bias Detector – समाजातील अचेतन भेदभावाचे विश्लेषण,डिजिटल मानसिक आरोग्याचे राष्ट्रीय आरसे हे समाजाला स्वतःकडे पाहण्याचे नवे वैज्ञानिक साधन उपलब्ध करून देतील. तर मानवी उत्क्रांती — द्विप्रवाह क्रांती मानवी परिवर्तन दोन प्रवाहांत घडेल(अ) जेनेटिक इम्प्रोव्हमेन्ट आरोग्य, पोषण, पर्यावरण, शिक्षण ,जैविक उन्नती(ब) Non-Genetic इवोलुशन,नैतिकता, विचारशक्ती, कौशल्य आणि सहानुभूती मानसिक–आध्यात्मिक उन्नती या दोन प्रवाहांतून तयार होईल उच्च चेतनामय मानव प्रकार जो जात, धर्म, प्रदेश, वंश याच्या सर्व सीमांच्या पलीकडे आहे.                                        ॲड.गवळी यांनी सांगितले कि, 2037 – एकात्मिक मानवतेची पहाट ठरून 2037 पर्यंत हे मिशन भारताला नव्या युगात नेईल:                                          “मानवधर्म” – सर्वमान्य मूल्यव्यवस्था समतेवर आधारित राजकारण व कायदे वैज्ञानिक, समत्ववादी, करुणामय समाज NISARGPAL ही भारताची नवी आत्मओळख राहील. डॉ. आंबेडकरांचे 1937 चे स्वप्न“जातिविनाश”आता विज्ञान, चेतना आणि IKT च्या सामर्थ्याने साकार होईल.

शेवटी बोलतांना ते म्हणाले की “जात ही अंधाराची सावली आहे; IKT हे ज्ञानाचे सूर्य आहे.” “चेतना एकच – मानव एकच – भारत एकच.” आहे या मिशन मुळे “2037: डॉ. आंबेडकरांचा संकल्प साकार — जातमुक्त भारत उदयास.” येईल!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

error: Content is protected !!