पंढरपूर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समाचार : – सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान समारंभ २२ जून २०२५ रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. त्यांच्या दीर्घकालीन सेवा योगदानाबद्दल गौरव व्यक्त करण्यासाठी ‘सेवा गौरव समिती’च्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पंढरपूर येथील श्रीसाई हॉटेल, साईनगर, स्टेशन रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री. पी. एल. देशमुख (पिढलहिवरेचे अधिवासी) असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्राचार्य रिघवायकर (स्वागताध्यक्ष अंबाजोगाई), डी. एन. बोडके (उपअधिक्षक अभियंता), श्री. गिरीष वाघमारे (से. नि.), श्री. माणिकराव, एन. एन. कदम आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तीन दशकांहून अधिक काळ सेवा दिली असून, त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनहिताचा दृष्टिकोन सदैव केंद्रस्थानी राहिला.कार्यक्रमात त्यांचे सहकारी, विभागीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्वांनी उपस्थित राहून त्यांच्या सेवेला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
