अहिल्यानगर — सी. डी. देशमुख लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षातील पास आऊट विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्राचे सचिव तथा सदस्य ऍड. लोखंडे बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 एप्रिल 1942 ला बाबाजी पाटील यांची केस घेतले त्यात बाबाजी पाटलांचे वकील डॉ.बाबासाहेब असल्यामुळे पाटील केस जिंकले त्याचे उदाहरण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. अहिल्याबाई होळकर यांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलांचे ही उदाहरण यावेळी दिले. माणसाने मन नेहमी तरुण ठेवावे संविधानाने निसर्गाचे संवर्धन केले. सर्वांचा विचार भारतीय संविधानाने केला, भारतीय स्त्रीला सक्षम केलेले आहे, लोखंडे साहेबांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सर्वच स्रोते संविधानाने दिलेल्या हक्क अधिकार आणि कर्तव्याचं पालन करण्याचा प्रयत्न निश्चित करतील असे प्रतिपादन केले.
यावेळी सीडी देशमुख लॉ कॉलेजचे प्रा. ना. म. साठे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले ते म्हणाले राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे आपण शस्त्राची पूजा करावयास पाहिजे. म्हणजे या शस्त्राचा उपयोग आपणास आपल्या शत्रूवर करता येईल. याचाच अर्थ आपल्याला राजकीय सत्ता मिळवल्याशिवाय पर्याय नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. परंतु बाबासाहेब म्हणाले विद्यार्थी दशेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राजकारणात भाग घेता कामा नये कारण अभ्यास सोडून तेच राजकारणात पडले तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते. परंतु विद्यार्थ्यांनी निवडणुकात अल्प काळ,आपल्या अडाणी जनतेला, मतदारांना, निवडणुकीतील मतदार यादीत नावे टाकणे निवडणुकीची सर्व माहिती दिली पाहिजे. विद्यार्थ्यांवर दोन्ही जबाबदाऱ्या आहेत. प्रथम जबाबदारीत विद्यार्थ्यांनी चमक दाखवली पाहिजे असे प्राध्यापक नाम साठे यांनी प्रतिवादीत केले. प्रा. रियाज बेग विद्यार्थी प्रतिनिधी सौ. पल्लवी जगताप सौ. नरके, श्री साठे, श्री अबुज,श्री दीपक कानडे,श्री बाबुराव पाचंगे, यांचेही यावेळी भावनिक असे भाषणे झाली. यावेळी फ्रँकलिन शेक्सपियर,आदित्य कोळी सौ. देशमुख, सौ.राऊत श्री. पोटावले. श्री सटाळे,श्री कांडेकर,श्री बेलदार यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री. कवाद सर यांनी केले आभार प्रदर्शन दीपक कानडे यांनी मानले, कॉलेजचा सर्व स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
