Homeमहाराष्ट्रएमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी सेवेत कु. श्रद्धा टोंपेची कौतुकास्पद कामगिरी

एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी सेवेत कु. श्रद्धा टोंपेची कौतुकास्पद कामगिरी

   मुलींमध्ये प्रथम क्रमांक ! राज्यात गौरव! अभिनंदन!

पुणे/ महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कु. श्रद्धा सौदागर टोंपे हिने पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश संपादन केले आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने आपल्या प्रतिभेची तेजस्वी छाप उमटवली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील रहिवासी असलेल्या श्रद्धा हिचे शैक्षणिक यश अधिक उल्लेखनीय आहे. तिचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपविभाग, परांडा येथे कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले असून त्यांच्या संस्कारांची व परिश्रमाची ही फलश्रुती असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केवळ 22 व्या वर्षी कु. श्रद्धा टोंपे हिची उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या अलौकिक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

इंजी. कु. प्रेरणा थोरात, इंजि. कु. संध्याराणी काळे, इंजि. दिशा देडगे, इंजि. मयुरेश कुंजीर आदींनी श्रद्धाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कु. श्रद्धा टोंपे हिने दाखविलेल्या मेहनतीची आणि प्रतिभेची दखल घेत सर्वजण तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत. तिच्या यशामुळे परांडा तसेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

कु. श्रद्धा आपले वडील श्री. टोम्पे व आई बरोबर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

error: Content is protected !!