शेवगाव/अहिल्यानगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या “Transformative 100 Days” विशेष मोहिमेत सा. बां. शेवगाव उपविभागाचे उपअभियंता श्री. प्रल्हाद पाठक यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेत प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.या विशेष मोहिमेचा उद्देश उपविभागीय सरकारी कार्यालयांमधील कार्यपद्धती सुधारण्यासाठी राबविण्यात आला होता. श्री. पाठक यांच्या कार्यशैली मध्ये प्रशासनावर असलेली मजबूत पकड, वेळेचे व्यवस्थापन, पारदर्शक निर्णयप्रक्रिया व नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठळकपणे दिसून आला. त्यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाने राज्यातील इतर उपविभागांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.पाठक यांनी जनसामान्यात सा. बां. खात्याची प्रतिमा उज्वल केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-समंतकर यांच्या हस्ते सन्मानपत्र २९ मे २०२५ रोजी प्रदान करण्यात आले.

या यशानंतर अहिल्यानगर विभागीय कार्यालयात श्री. पाठक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एस. तारगे, राहुरीचे उपअभियंता जावेद सय्यद, अभियंता सुधीर शिंदे, प्रकाश थोरात,रियाज शेख आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा गौरव केवळ वैयक्तिक सन्मान न राहता, शेगाव उपविभागाच्या संपूर्ण कार्यसंस्कृतीचा गौरव असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. श्री. पाठक यांची कार्यशैली ही इतरांना प्रेरणा देणारी असून, त्यांनी भविष्यातही अशीच कार्यनिष्ठा कायम ठेवावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
