अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- भारतीय संविधान ही केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते एक जिवंत सामाजिक व नैतिक करारनामा आहे. यात व्यक्तीच्या अधिकारांइतकीचकर्तव्याचीही महत्त्वाची भूमिका आहे. विशेषतः अनुच्छेद ५१(अ) मधील मूलभूत कर्तव्ये होय.
आज जागतिक तापमानवाढ, (global warming) पाणीटंचाई, वनीकरणाची हानी आणि जैवविविधतेचा ऱ्हास या संकटांपुढे संपूर्ण मानवजात आज उभी आहे. या पार्श्वभूमीवर, निसर्गधर्म—अर्थात निसर्गाशी सुसंवादाने जगण्याचे नैसर्गिक व आध्यात्मिक कर्तव्य—हे केवळ धार्मिक वा सांस्कृतिक संकल्पना नसून, भारतीय संविधानानेही ती मान्य केली आहे. हे कर्तव्य संविधानाचा अनुच्छेद ५१(अ)(ग) मध्ये स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. आणि अन्य अनेक कर्तव्यांत त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. पीपल्स लाईनचे विधीज्ञ ॲड.कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले आहे.
म्हणूनच निसर्ग धर्माशिवाय मानव जातीला पर्याय राहिलेला नाही,‘निसर्गधर्म’ म्हणजे निसर्गाशी सुसंवादाने, समरसतेने जगण्याचा धर्म. येथे ‘धर्म’ म्हणजे कोणत्याही एका पंथाची शिकवण नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांशी दया, सुसंवाद, आणि रक्षणाची नैसर्गिक जबाबदारीआहे.
ही संकल्पनाच सांगते की – मानवी जीवन निसर्गापासून वेगळे नाही. निसर्ग फक्त वापरण्याची गोष्ट नाही, तो सर्व प्राणीमात्रांचा पालन करणारा माता-पिता आहे.निसर्गाचे रक्षण हेच खरी राष्ट्रसेवा आणि मानवसेवा आहे.
आणि आपल्या संविधानाने अनुच्छेद ५१(अ)(ग) : मध्ये निसर्गधर्माचे स्पष्ट स्पष्ट करून ते प्रत्येक भारतीयांना स्वीकारायला कायद्याने सांगितले आहे.
या अनुच्छेदात सांगितल्याप्रमाणे “प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल की, तो निसर्ग पर्यावरणाचा – जसे की, वन, सरोवरे, नद्या, वन्यजीव – रक्षण व संवर्धन करील आणि प्राणीमात्रांविषयी करुणा बाळगेल.”ही एक अभूतपूर्व घटना आहे की, आधुनिक संविधानाने निसर्गाशी संबंधित कर्तव्य थेट नमूद केले आहे.यामध्ये तीन प्रमुख मुद्दे आहेत त्यात
संवर्धन (Conservation),रक्षण (Protection),करुणा (Compassion) हेच तीन घटक निसर्गधर्माचे आधारस्तंभ आहेत. असे पीपल्स हेल्पलाइन चे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे
याकरिता सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते निसर्ग धर्माचे अनुयायी प्रयत्नशील आहे. यामध्ये अशोक सब्बन, कैलास पठारे, प्रकाश थोरात, सरपंच सखाराम सरक, ॲड.अमित थोरात, अशोक भोसले, संदीप पवार, बबलू खोसला, भगवान जगताप, वीर बहादुर प्रजापती, हे प्रयत्नशील आहेत. अन्य कर्तव्यांत निसर्गधर्माचे प्रतिबिंब अनुच्छेद ५१(अ) मधील इतर कर्तव्यांमध्येही निसर्गधर्माचे सूक्ष्म प्रतिबिंब दिसते:अनुच्छेद कर्तव्य निसर्गधर्माशी संबंध ५१(अ)(अ) संविधानाचे पालन करणे संविधाना मध्ये निसर्ग रक्षणाचे मूल्य स्वीकारले आहे.५१(अ)(ई) बंधुभाव व ऐक्य वाढविणे निसर्गातील सर्व प्राणी बंधु मानले तरच खरा बंधुभाव ५१(अ)(ह) वैज्ञानिक दृष्टीकोन व मानवतावाद वाढविणे पर्यावरणीय विज्ञान, हवामान अभ्यास,जलसंवर्धना चा समावेश ५१(अ)(ज) सर्व क्षेत्रांत उत्कृष्टतेसाठी प्रयत्न शाश्वत शेती, जलसंधारण, वृक्षारोपण यामध्ये उत्कृष्टतेचा आग्रह हे ऐच्छिक कर्तव्ये का अनिवार्य ठरली पाहिजेत?
आजपर्यंत ही कर्तव्ये ऐच्छिक (voluntary) आहेत. पण नैतिकदृष्ट्या ती अनिवार्य आहेत. कारण:मानवानेच निसर्गाचे सर्वाधिक शोषण केले आहे.आता निसर्गाचे रक्षण करणे हे फक्त कायदेशीर नव्हे, तर अस्तित्वासाठी आवश्यक बनले आहे.आपण अधिकार मागतो, पण कर्तव्ये विसरतो. निसर्गधर्म हीच त्याची भरपाई आहे. त्याकरिता ‘रेन गेन बॅटरी’ आणि ‘धनराई’ – निसर्गधर्माची कृतीशील उदाहरणे
नुसते विचार पुरेसे नाहीत. तर कृती महत्त्वाची आहे.
रेन गेन बॅटरी:वृक्षाच्या मुळांपाशी खड्डा खोदून, त्यात खडी व मुरूम भरून पावसाचे पाणी लगेच त्या खड्ड्यात नेणे. त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि झाडाला वर्षभर नमी मिळते.धनराई:कोरडवाहू व उरलेली जमीन फळझाडे वा औषधी वनस्पतींसाठी वापरणे. पावसाचे पाणी रेन गेन बॅटरीद्वारे साठवून पिकांना दिले तर शाश्वत उत्पन्न व जैवविविधता दोन्ही वाढते. हे केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर संविधानातील कर्तव्यांची कृतीशील पूर्तता आहे. यातून असा निष्कर्ष निघतो की निसर्गधर्म हाच खरा राष्ट्रधर्म,
आज राष्ट्रगीत “वन्दे मातरम्” म्हटले जाते, पण मातेप्रमाणे निसर्गाचे पालन करण्याचा धर्म मात्र विसरला जातो. भारतीय संविधानाने आपल्याला ही आठवण करून दिली आहे – की तुमच्या कर्तव्यांत निसर्गाचे रक्षण हे एक पवित्र कर्तव्य आहे. जर आपण हा धर्म पाळला नाही, तर भविष्यातील पिढ्या आपल्याला संविधानद्रोही आणि निसर्गद्रोही म्हणतील.
म्हणून आज आपण सगळ्यांनी स्वतःला सांगायचं आहे
“मी निसर्गभक्त आहे. मी संविधाननिष्ठ आहे. मी निसर्गधर्म पाळणारच.” असा सर्व भारतीयांनी संकल्प करावा असा आग्रह ज्येष्ठविधीज्ञ ॲड.कारभारी गवळी यांनी धरला आहे
