अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्या नियुक्ती निमित्त सत्कार सोहळा
अहिल्यानगर (दि.20 सप्टेंबर) डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समिती, नवी दिल्ली यांच्या वतीने अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे व पुणे जिल्हाध्यक्ष संविधानअभ्यासक पत्रकार सुदाम कांबळे यांच्यामार्गदर्शनाखाली करण्यात आली.
समाजकारणात दाखविलेली निष्ठा, समाजजागृतीसाठी केलेले कार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती असलेला आदर याची दखल घेत गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. समितीने अपेक्षा व्यक्त केली आहे की, त्यांनी दिलेल्या पदाचा योग्य वापर करून सामाजिक बांधिलकी दृढ करावी, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे आणि कोणत्याही वादविवाद अथवा राजकारणात न अडकता समितीच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करावी.या नियुक्तीबद्दल जिल्हाभरात अण्णासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन होत असून सामाजिक चळवळीत नवा उत्साह निर्माण झाला आहे.
या प्रसंगी प्रकाश थोरात यांनी अण्णासाहेब गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीची वाटचाल अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्या नियुक्ती निमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या वेळी पीपल्स हेल्प लाईनचे प्रकाश थोरात, पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन शंकरराव मुळे, प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रामदास वाघ, सर्जेराव शिरसाठ, मराठा क्रांतीचे विजय भगत, विठ्ठल भिंगारदिवे, सुभाष आल्हाट, बौद्धाचार्य निलेश जाधव यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अनिल घाटविसावे, सलीमभाई शेख, मुन्नाभाई शेख, असीफ बेग, समीर शेख, मिलींद आंग्रे, संजय देवढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांचे अभिनंदन करताना त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत नवा आत्मविश्वास व उर्जा निर्माण झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

