अहिल्या नगर नाशिक तारकपूर कार्यकारिणीच्या सुनील भाऊ निरभावणे यांचा च्या वतीने सत्कार!
मुंबई :- प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य समाचार ) कास्ट्राइब राज्य परिवहन संघटनेचा 45 वा वर्धापन दिन मुंबई दादर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सुनील भाऊ निरभावणे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेत नाशिक प्रदेश कार्यकारिणी, अहिल्यानगर विभागीय कार्यकारिणी तसेच तारकपूर आगार कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विभागीय अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, सरचिटणीस शशिकांत वाघचौरे, तारकपूर आगार अध्यक्ष पुप्पाल, सागर भालेराव, संदीप गायकवाड (संगमनेर), जाधव, श्याम जाधव (कोपरगाव), कोपरे तसेच अहिल्यानगर विभागातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शरद शिंगाडे आणि संतोष ससाणे यांचीही विशेष उपस्थिती होती.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संघटनेच्या भावी उपक्रमांवर चर्चा झाली तसेच संघटनेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मोलाचे निर्णय घेण्यात आले. कार्यक्रम संयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त झाले.


